नांदेड, दि. 05 ऑक्टोबर 2025 (प्रतिनिधी):
नांदेड जिल्ह्यातील नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याने सलग तपास करून आठ सराईत गुन्हेगारांचा पर्दाफाश केला आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे अर्चना पाटील विभागीय पोलीस अधीक्षक भोकर यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली.
🔹 घडलेली घटना व तपासाचा मागोवा
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 55 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल होते.
या संदर्भात पोलीस निरीक्षक उमाकांत चिंचोलकर यांच्या पथकाने 22 ऑक्टोबर 2024 ते 18 जुलै 2025 दरम्यान सातत्याने माहिती गोळा करून तपास पूर्ण केला.
तपास पूर्ण झाल्यानंतर 30 सप्टेंबर 2025 रोजी गुन्हेगारांविरुद्ध प्रस्ताव सादर करण्यात आला.
🔹 हद्दपार प्रस्ताव सादर करणारे अधिकारी
- उमाकांत चिंचोलकर – पोलीस निरीक्षक, पो.स्टे. नांदेड ग्रामीण
- उदय खंडेराय – पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा), नांदेड
- व्यंकट कुसुमे– पोलीस उप निरीक्षक
- ज्ञानेश्वर माटवाड – पोलीस उप निरीक्षक
- बाबुराव चव्हाण– पोलीस उप निरीक्षक
- पोलीस आमदार वसंत केंद्रे, सत्तार शेख, अर्जुन मुंडे, संतोष पवार, शिवानंद तेचबंद, विष्णू कल्याणकर शंकर माळगे रवींद्र सिरमनवार मारुती पचलिंग व विठ्ठल शेळके स्थानिक गुन्हे शाखा पोलीस कर्मचारी वरीलपैकी सर्व पोलीस अधिकारी च्या मार्गदर्शनाखाली पथकात कामगिरी बजावली
🔹 हडपार इसमांची नावे व पत्ते
- सुमेध उर्फ बाळाराजु वाघमारे, वय 26 वर्षे, रा. बळीरामपूर, ता. नांदेड.
- दीपक उर्फ गुगलू सुहास गोडबोले, वय 24 वर्षे, रा. बळीरामपूर, ता. नांदेड.
- विशाल रमेश शीतळे, वय 23 वर्षे, रा. ND
- विजयनगर सिडको नांदेड.
- गोविंद ईश्वर वट्टमवार, वय 21 वर्षे, रा. विजय नगर सिडको, नांदेड.
- सटवाजी ज्ञानोबा ढवळे, वय 52 वर्षे, रा. शांतीनगर सिडको, नांदेड.
- आशिष सटवाजी ढवळे, वय 23 वर्षे, रा. शांतीनगर, सिडको नांदेड.
- सुनील भगवानराव सूर्यवंशी, वय 35 वर्षे, रा. क्रांती चौक सिडको, नांदेड.
- राहुल गोविंद लांडगे, वय 35 वर्षे, रा. बाबुळगाव, नांदेड.
🔹 कारवाईचे तपशील
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार संबंधित आरोपींवर नांदेड जिल्हा हद्दीबाहेर हद्दपार कारवाईचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
पोलीस निरीक्षक उमाकांत चिंचोलकर यांनी संपूर्ण तपास पूर्ण करून जिल्हाधिका यांच्या कडे प्रस्ताव सादर केला होता.
त्यावरून 30 सप्टेंबर 2025 रोजी आदेशानुसार आरोपींना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
🔹 पोलीस अधीक्षकांचे मत
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले की,
“गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी हद्दपार कारवाई सुरू ठेवली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांचे हे पथक उल्लेखनीय काम करत असून, अशा सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरू राहील.”












