नांदेड, दि. 24 ऑक्टोबर :
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार हे शनिवार, दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, उमरी व देगलूर तालुक्यांमध्ये होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यांना उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे पक्षकार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दौऱ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –
🔹 सकाळी 10.00 वा. – मुंबई विमानतळावरून विमानाने प्रयाण करून श्री गुरु गोविंदसिंगजी विमानतळ, नांदेड येथे आगमन.
🔹 सकाळी 10.10 वा. – हेलिकॉप्टरने गोरठा (ता. उमरी) कडे प्रयाण.
🔹 सकाळी 10.30 वा. – गोरठा हद्दीतील कोर्ट ऑफिसच्या मोकळ्या जागेवरील हेलिपॅडवर आगमन.
🔹 सकाळी 10.40 वा. – मोंढा मैदान, उमरी येथे आगमन व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती.
🔹 दुपारी 12.30 वा. – श्री. शिरीष देशमुख गोरठेकर यांच्या निवासस्थानी, गोरठा येथे भेट व राखीव वेळ.
🔹 दुपारी 1.25 वा. – हेलिकॉप्टरने देगलूरकडे प्रयाण.
🔹 दुपारी 1.40 वा. – देगलूर महाविद्यालय हेलिपॅड येथे आगमन.
🔹 दुपारी 1.50 वा. – हजरत शाह जियावोद्दीन रफाई दर्गा, देगलूर येथे भेट.
🔹 दुपारी 2.00 वा. – मोंढा मैदान, देगलूर येथे कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती.
🔹 सायं. 4.05 वा. – श्री. लक्ष्मीकांत पद्यमवार यांच्या निवासस्थानी, देगलूर येथे आगमन व राखीव वेळ.
🔹 सायं. 4.45 वा. – हेलिकॉप्टरने नांदेडकडे प्रयाण.
🔹 सायं. 5.00 वा. – श्री गुरु गोविंदसिंगजी विमानतळ, नांदेड येथे आगमन.
🔹 सायं. 5.05 वा. – विमानाने पुण्याकडे प्रयाण.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या दौऱ्यात जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेणे, स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणे व पक्षबांधणीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून, उमरी व देगलूर येथे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.












