aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, February 26, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, February 26, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारांविरोधात ऐतिहासिक धडक 135 सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
December 17, 2025
in क्राईम
0
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp



नांदेड १७ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे जिल्ह्यात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व समाजातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलीस दलाने व्यापक आणि निर्णायक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील सराईत व धोकादायक गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करत पोलिस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली प्रतिबंधात्मक मोहिम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर विशेष नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वारंवार गुन्हे करणारे, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले तसेच समाजात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांची सखोल नोंद (रेकॉर्ड) तयार करून त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमान्वये कठोर कारवाई करण्यात येत आहे. एमपीडीए (MPDA) कायद्यांतर्गतही कारवाईचे प्रस्ताव तयार करून अंमलबजावणी सुरू आहे.

पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 55 अन्वये आतापर्यंत 46 प्रकरणांमध्ये तब्बल 135 गुन्हेगारांना नांदेड जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले आहे. तसेच एमपीडीए कायद्यांतर्गत 44 सराईत गुन्हेगारांवर कारवाईचे प्रस्ताव दाखल करण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समन्वयाने त्यावर कार्यवाही सुरू आहे. याशिवाय, कलम 56 अंतर्गत 269 प्रस्ताव व कलम 57 अंतर्गत 66 प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत 150 पेक्षा अधिक सराईत व गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवरही कडक नजर ठेवण्यात येत असून, आवश्यकतेनुसार त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी जनतेला स्पष्ट संदेश देताना सांगितले की, “कायद्यापुढे कोणीही मोठा नाही. जनतेची सुरक्षितता व सुव्यवस्था हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.”
या कठोर भूमिकेमुळे नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश बसत असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होत आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

माळेगाव यात्रेत लोकसंस्कृती कृषी व सामाजिक उपक्रमांचा भव्य संगम

Next Post

अवैध रेती उपशावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा घाव ४०.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

क्राईम

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई चांदीचे दागिन्यांसह दोन गुन्हेगारांना अटक

February 26, 2026
क्राईम

हद्दपार आदेशाचा भंग बळीरामपूरमध्ये संघर्ष पवळे खंजरासह जेरबंद

February 24, 2026
क्राईम

नांदेड विभागात RPF ची मोठी कारवाई

February 23, 2026
क्राईम

नांदेड शहरात वैशिष्ट्यपूर्ण वाहने फटाका बुलेट आणि हुलडबाजी करणाऱ्यांवर धडक कारवाई

February 20, 2026
क्राईम

जालना रेल्वे स्थानकावर आरपीएफची धाड दलालाला अटक प्रवाशांकडून घेतलेले कमिशन जप्त

February 19, 2026
क्राईम

गोदावरी पात्रातील अवैध रेती उपशावर नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

February 18, 2026
Next Post

अवैध रेती उपशावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा घाव ४०.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई चांदीचे दागिन्यांसह दोन गुन्हेगारांना अटक

February 26, 2026

नांदेड-संबलपुर एक्सप्रेसमध्ये तात्पुरती डबे वाढ प्रवाशांना दिलासा

February 26, 2026

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामंडळाचा उद्घाटन सोहळा

February 26, 2026

महाराष्ट्रात मोठा महसूल सुधारणा कायदा लागू NA परवानगी आणि करात ऐतिहासिक बदल

February 25, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • रॉयल स्टे लॉजवर टाकला छापा

    0 shares
    Share 0 Tweet 0
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved