प्रतिनिधी – माधव वाघमारे, भोकर / नांदेड
भोकर २५ फेफ्रुवारी मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड व तालुका प्रशासन, भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामंडळाचा उद्घाटन समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला.
हा कार्यक्रम शनिवार, दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता हनुमान नगर येथील खुले मैदान, किनवट रोड, भोकर येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. नरेंद्र के. ब्रह्मे (प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड) होते. तर उद्घाटन मा. न्यायमूर्ती श्री. संदिपकुमार सी. मोरे (न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबी, खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर) व मा. न्यायमूर्ती श्री. निरज पी. धोटे (न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबी, खंडपीठ नागपूर व पालक न्यायमूर्ती, नांदेड) यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी व्यासपीठावर मा. श्री. राहुल कर्डिले (जिल्हाधिकारी, नांदेड), मा. श्रीमती मेघना कावली (मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड) व मा. श्री. अबिनाश कुमार (पोलीस अधिक्षक, नांदेड) हे मान्यवर उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाचे नियंत्रक म्हणून मा. गोष्टमंद नामिर मो. सलीम (अध्यक्ष, ता. विशेष स्थापना, भोकर) व मा. श्री. शादी. देहापोड (सिंध, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड) यांनी परिश्रम घेतले.
या महाशिबिरात विधी सेवा व शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. विविध विभागांनी स्थापित केलेल्या महामंडळांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना थेट लाभ वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.












