नांदेड प्रतिनिधी 19/092025 अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष माननीय रमेश जी जाधव यांची नांदेड जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
गेली अनेक वर्ष ते अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील तळागाळातील खेड्यापाड्यातील समाज बांधवांना जोडण्याचं काम करत आहेत याचबरोबर कुठेही अन्याय झाला अत्याचार झाला तर तेथे जाऊन सामान्य समाज बांधवांना न्याय द्यायचं काम त्यांनी केलं आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय कैकाडी महासंघराज्य कार्यकारिणीने त्यांना नांदेड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्त पत्र देऊन सन्मानित केला आहे.
आपली निवड झाल्याबद्दल रमेश भाऊ आपले हार्दिक अभिनंदन या पुढे ही आपण समाजासाठी असेच सक्रिय राहून कार्य कराल हीच अपेक्षा महासंघ कार्यकारणीला आहे.
आपले
डॉक्टर संजय मेडे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय कैकाडी महासंघ
अमोल जी माने राज्य कार्याध्यक्ष
शरद माने राज्य सचिव
याचबरोबर महासंघाचे राज्यसहसचिव राज्य संघटक राज्य उपाध्यक्ष त्याचबरोबर राज्य मार्गदर्शक












