नांदेड ४ ऑक्टोंबर (प्रतिनिधी)
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने वाजेगाव बायपास रोडवरील दोघा आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या कडून रॉयल स्टॅग 180 ML31 बाटला किंमत 250 प्रमाणे एकूण १०,७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
📌 प्रकरण तपशील:
दिनांक २९ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वा. ते ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान वाजेगाव बायपास रोडवरून दोन आरोपी हे ब्लॅक मध्ये दारू विकत असताना फिर्यादी पांडुरंग परसराम पुयड यांनी गोपनीय माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली माहितीप्रमाणे पोलीस निरीक्षक उमाकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शन नुसारे . तक्रार नोंद झाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड वसंत केंद्रे विष्णू कल्याणकर संतोष पवार मारुती पचलिंग व गंगलवाड हे पथकात सामील होते सर्व पोलीस कॉन्स्टेबल
📌 अटक आरोपींची नावे:
- शेख इमरोज शेख अब्दुल रज्जाक (३२ वर्षे, राहणार वाजेगाव ता. जि. नांदेड)
- इरफान खान नसरत खान(२५ वर्षे, राहणार वाजेगाव ता. नांदेड)
📌 जप्त मुद्देमाल:
- रॉयल स्टॅग 180 ML 31बाटला
- रोकड रक्कम
एकूण किंमत: १०,७५० रुपये
📌 पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शन:
- मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड
- मा. श्री. सूरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड
- मा. श्री. प्रशांत शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा
- श्री. उमाकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक, नांदेड ग्रामीण ठाणे
👉 या कारवाईत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने दक्षता दाखवून अवघ्या काही दिवसांत आरोपींना जेरबंद केले. सदर कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांनी पोलीस दलाचे कौतुक केले आहे.












