राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्याच्या धानोरा गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व याबाबत शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी शासनाकडे मांडणार असल्याचे त्यानी यावेळी सांगितले.












