नांदेड 12 मार्च प्रतिनिधी माधव वाघमारे
नांदेडचे पोलीस अधीक्षक श्री. अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, शहरातील वाढती ट्रॅफिक समस्या आणि नियमभंग करणाऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहर वाहतूक शाखा (वजिराबाद व इतवारा) यांनी विशेष मोहीम राबवली आहे.
कारवाईचा तपशील:
- एकूण कारवाई: ३४३ केसेस
- दंडाची रक्कम: ३,६५,९००/- रुपये (वजिराबाद: ३,०६,१५०/- व इतवारा: ५९,७५०/-)
कोणावर कारवाई करण्यात आली? - बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर.
- विनापरवाना/परमिट नसलेली वाहने.
- भरधाव वेगाने वाहने चालवणे.
- ‘फटाका’ सायलन्सर असलेल्या बुलेट दुचाकी.
- वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे हातगाडे/फळगाडे.
- ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांवर.
नागरिकांना आवाहन:
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपली वाहने पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करावीत, रस्त्यावर अतिक्रमण करू नये, ट्रॅफिक सिग्नलचे पालन करावे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे कृत्य टाळावे. सहकार्य न केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
ही मोहीम पोलीस अधीक्षक श्री. अविनाश कुमार आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली.












