aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

सिंधखेड पोलिसांची मोठी कारवाई सराईत गुन्हेगार किशोर राठोड तीन जिल्ह्यांतून पाच महिन्यांसाठी तडीपार

Aawaz Times by Aawaz Times
March 25, 2026
in क्राईम
0
0
SHARES
38
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड:२५ मार्च प्रतिनिधी माधव वाघमारे

जिल्ह्यात गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही वर्तनात सुधारणा न करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध आता थेट तडीपारीचे अस्त्र उगारले जात आहे. पोलीस अधीक्षक अभिनश कुमार यांच्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत सिधखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार किशोर प्रेमसिंग राठोड याला नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांतून पाच महिन्यांकरिता हद्दपार (तडीपार) करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
सिंधखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे सारखणी (ता. किनवट) येथील रहिवासी किशोर प्रेमसिंग राठोड याच्यावर विनयभंग, शिवीगाळ, मटका, जुगार आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा प्रस्ताव सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला होता.
प्रशासकीय कारवाईचा बडगा
उपविभागीय अधिकारी (माहूर) किरण भोंडवे यांच्यामार्फत हा अहवाल सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी (किनवट) जेनीत दोन्तुला यांच्याकडे सादर करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५६(१)(ब) अन्वये सदर गुन्हेगाराला तीन जिल्ह्यांतून ५ महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश २४ मार्च २०२६ रोजी निर्गमित करण्यात आले.
वरिष्ठांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (माहूर) किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सिंधखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव व प्रतिबंधक कारवाई पथकाने या प्रकरणाचा यशस्वी पाठपुरावा केला.
या तडीपारीच्या आदेशामुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन कठोर पावले उचलत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेडमध्ये बुलेटच्या ‘फटाक्यां वर पोलिसांचा हातोडा जप्त केलेले सायलेन्सर रोलरखाली चिरडले

Next Post

नांदेड रेल्वे विभागाची सौर झेप वीज बचतीतून वर्षाला लाखो रुपयांचा गल्ला ठरणार पदरी

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले
क्राईम

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
क्राईम

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
क्राईम

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026
भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद
क्राईम

भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद

June 18, 2026
२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक
क्राईम

२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक

June 18, 2026
Next Post

नांदेड रेल्वे विभागाची सौर झेप वीज बचतीतून वर्षाला लाखो रुपयांचा गल्ला ठरणार पदरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved