नांदेड (दि. 21 सप्टेंबर) :
नांदेड शहरातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वी कारवाई करत चोरट्यांकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. एकूण 95,500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, चार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
घटनेचा तपशील
दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता पोलिस उपअधीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून ही कारवाई केली. अटक आरोपींमध्ये
- शिवम उर्फ चिक्या गंगाधरराव वडजे (वय 18, रा. दगडगाव ता. लोहा जि.नांदेड) व्यवसाय बेकार
- गोविंद देवराव गच्चे (वय 31, रा. तरोडा खुर्द नांदेड) व्यवसाय बेका
- शेख शाहरुख उर्फ कबूतर पिता शेख अजगर (वय 29, रा. महबूब या कॉलनी इतवारा नांदेड) व्यवसाय बेकार
- जयकुमार उर्फ सोनू पिता कैलास राऊत(वय 24, रा. सुमेध नगर कॅनल रोड नांदेड)
यांचा समावेश आहे.
जप्त केलेला मुद्देमाल
- एक काळा रंगाची स्प्लेंडर (MH-26 CF 2945) किंमत 70,000 रुपये
- दोन मोबाईल किंमत 24,500 रुपये
- रोख 1,000 रुपये
एकूण किंमत : 95,500 रुपये
पोलिसांची भूमिका
पोलिस अधीक्षक श्री. अबीनाश कुमार यांच्या आदेशानुसार व अप्पर पोलिस अधीक्षक श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. उदय खंडेराय यांच्या नेतृत्वाखालील पो.नि.श्री मिलिंद सोनकांबळे पो उप नि. महेश कोरे पो. कॉन्स्टेबल सुनील गटलेवार रविशंकर बामणे पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम दासरे माधव माने संघरत्न गायकवाड अनिल बिराजदार देवकते पथकाने ही मोहीम राबवली.
पुढील कार्यवाही
वरील आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयीन कोठडीत हजर केले असून, पुढील तपास सुरू आहे.
👉 नांदेड पोलिसांच्या या कारवाईमुळे अलीकडच्या काळात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा बसणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












