नांदेड 04/09/2025 गणेशोत्सव बंदोबस्त अनुषंगाने कायदा व सुखव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मा .श्री. अबिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत ठिकठिकाणी शांतता कमिटी बैठका घेऊन लोकांना तसेच प्रत्येक गणेश मंडळांना शांतता राखण्याचे आव्हान केले आहे गणेशोत्सव बंदोबस्त शांततेत पार पाडावा यासाठी नांदेड जिल्ह्यातील महत्त्वाचे सर्व ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून कोणतेही अनुचित प्रकार होणार नाही यांची सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे गणेशोत्सव बंदोबस्त कमी नांदेड शहर ग्रामीण भागातील पोलीस अधिकारी अमलदार तसेच बाहेरून सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी अमलदार यांना नेमण्यात आले आहे दि 06/09/2025 रोजी श्री गणेश विसर्जन होणार आहे श्री गणेश विसर्जन शांततेत पार पाडावे या अनुषंगाने मा श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड शहरात पोलीस स्टेशन इतवारा -इतवारा बाजार- सराफा- बर्फी चौक- जुना मोंढा वजीराबाद -कला मंदिर- शिवाजीनगर -आयटीआय चौक या मार्गावर पतसंंचलन घेण्यात आले सदर पतसंचनामध्ये मा श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड माननीय श्री सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक मा श्री परमेश्वर व्यंजने उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर महा श्री प्रशांत शिंदे उपविभागीय पोलीस अधिकार इतवारा पोलीस निरीक्षण 08. सापोनि/पोउपनि 14. पोलीस अंमलदार 150 होमगार्ड 100 आरसीपी 02 क्यूआरटी प्लेटून 01. वृज वाहन व दोन ठार वाहनासह सहभागी झाले अशाच प्रकारे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत पतसंचलन घेण्यात येत आहे व इंडिया डॉमिनेशन ऍक्टिव्हिटी चालू आहे गणेशोत्सव बंदोबस्त अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुख व्यवस्था अबाधित राखण्यासाठी मा श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी भयमुक्त व डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करणे बाबत यांना जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे












