नांदेड :19 नोव्हेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आदेशावरून (उस्माननगर) पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ₹75 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 18 नोव्हेंबर रोजी पहाटे 8वाजताच्या सुमारास श्री निलेश नीलपत्रेवार मौजे कोडगाव गोदावरी नदीपात्र परिसरात कारवाही करण्यात आली.
कारवाईची प्रमुख माहिती
- कारवाई करणारे पोलिस ठाणे: (उस्मानगर)
- गुन्हा नोंद: क्र. 276/2025, कलम 379, 3(2)(3)(5) BNS, वाळू महसूल अधिनियम
- घटनास्थळ: मोजे कोडगाव ता लोहा, गोदावरी नदीपात्र
- वेळ: 18.11.2025 रोजी सकाळी 8.00 वाजता
जप्त केलेला मुद्देमाल
- एकूण 3 मोठे इंजिन बोट (पाखर) – किंमत सुमारे ₹45,00,000
- 2 लहान इंजिन बोट (पाखर) – किंमत सुमारे ₹30,00,000
- एकूण मुद्देमालाची किंमत – ₹75,00,000
कारवाईमध्ये सहभागी अधिकारी
- मा. श्री अबिनाश कुमार – पोलीस अधीक्षक, नांदेड
- मा. श्रीमती अर्चना पाटील – अप्पर पोलीस अधीक्षक, भोकर
- मा. श्री सुरज गुरव– उपविभागीय अप्पर पोलीस अधिकारी.
- मा. श्री.डॉ. अश्विनी जगताप – उपविभागीय पोलीस अधिकारी, कंधार
कारवाई कशी उघडकीस आली?
उमरी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ पथक तयार केले. पथकाने नदीपात्रावर छापा टाकून दोन्ही बाजूने घेराव घालत टोळीला पकडण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असला तरी पोलिसांनी जवळपास 5 बोटी जप्त करण्यात यश मिळवले.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले की,
“अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील. नदीपात्रातील पर्यावरणीय हानी रोखण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक दक्ष आहे.”
नांदेड जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पोलिसांची ही मोठी आणि परिणामकारक कारवाई ठरली आहे. नदीपात्रातील अवैध उपसा करणाऱ्यांवर यामुळे मोठा धाक निर्माण झाला आहे.












