नांदेड, दि. २५ सप्टेंबर (प्रतिनिधी) :
नांदेड जिल्ह्यातील विविध भागात घरफोडी करणाऱ्या अंतरजिल्हा टोळीचा नांदेड पोलिसांनी पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७,२८,३३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यात ६१ ग्रॅम सोनं व २७० ग्रॅम चांदीचा समावेश आहे.
पोलिस अधीक्षक नांदेड मा.श्री. अबीनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकून आरोपींना जेरबंद केले. अटक आरोपींची नावे,
१) मंगल ज्ञानेश्वर चव्हाण (वय २६, रा. गौतम नगर सांगवी नांदेड ह मु पुणेगाव जिल्हा जालना
२) श्रीनिवास शिवाजी चव्हाण (वय २६, रा. सोनारी ता. हिमायतनगर, जि. नांदेड)
३) प्रतीक रब्बीसिंग राठोड (वय २०, रा. सोनारी ता. हिमायतनगर, जि. नांदेड) अशी आहेत.
आरोपींनी नांदेड शहरासह लोहा, नायगाव, कुंडलवाडी, बारड, हिमायतनगर, देगलूर अशा ठिकाणी घरफोडी केल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी सोनं-चांदीसह मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई अतिरिक्त पोलिस अधीक्षक मा.श्री. अबीनाश कुमार, अप्पर पोलिस अधीक्षक मा.श्री. अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी मा.श्री.सुरज गुरव यांनी समन्वय साधून केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय श्रीमती अश्विनी जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी पथक, उपनिरीक्षक, पोलिस कर्मचारी यांचा या मोहिमेत सहभाग होता.
नांदेड पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे घरफोडी करणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.












