aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home कृषी

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मंत्री संजय राठोड यांची पाहणी

Aawaz Times by Aawaz Times
September 25, 2025
in कृषी
0
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. 25 सप्टेंबर –
नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, रस्ते, पूल, घरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज हदगाव, अर्धापूर, नांदेड व लोहा तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन नुकसानीची पाहणी केली.

या दौऱ्यात मंत्री राठोड यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व धीर दिला. “एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे आश्वासन त्यांनी दिले.

बाधित गावांची पाहणी

धानोरा (ता. हदगाव), चिंचबन (ता. अर्धापूर), नांदुसा (ता. नांदेड), शेवडी व भेंडेगाव (ता. लोहा) या गावांमधील पिकांचे नुकसान त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. लोहा तालुक्यातील खराब झालेल्या पुल, विहिरी व रस्त्यांचीही त्यांनी पाहणी केली.

यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव पाटील कोहळीकर, आमदार आनंद पाटील बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील स्थितीचा आढावा

ऑगस्टपासून आतापर्यंत जिल्ह्यात तीन वेळा अतिवृष्टी झाली आहे. गोदावरी नदीला आलेल्या पूरामुळे अनेक गावांमध्ये बॅकवॉटरची परिस्थिती निर्माण झाली असून शेती व घरांचे नुकसान झाले आहे. शहरातील सखल भागात पाणी शिरल्याने 450 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत श्री. राठोड यांनी प्रशासनाकडून नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला.

प्रशासनाला दिलेले निर्देश

  • नुकसानीच्या मदतीच्या याद्या प्रत्येक गावात प्रसिद्ध कराव्यात
  • खचलेल्या व बुजलेल्या विहिरींचा अहवाल शासनाकडे पाठवावा
  • पाणी शिरलेल्या घरांचे पंचनामे करून पात्रांना आठवडाभरात मदत द्यावी
  • शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तातडीने सुरू करावा
  • गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात
  • दुरुस्त व नादुरुस्त रस्त्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत
  • मृत जनावरांच्या मदतीबाबतचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा

बैठकीत उपस्थित आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडल्या, तर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकसानीचा व मदतीचा आढावा सादर केला.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई  घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ७ लाखांहून अधिक किमतीचे सोनं-चांदी जप्त

Next Post

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कृषी

शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी यंत्रणा एकजूट पीएम धन-धान्य योजने अंतर्गत डॉ. निधी पांडे यांचा सविस्तर आढावा रेशीम शेतीची पाहणी

February 24, 2026
कृषी

माळेगाव यात्रेत सव्वा कोटींचा ‘उस्मानाबादी बोकड’ आकर्षणाचा केंद्रबिंदू

December 19, 2025
कृषी

नांदेड जिल्ह्यात बिबट्याची दहशत 25 बिबटे आढळल्याची माहिती, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

December 13, 2025
Uncategorized

गहू पेरणीच्या हंगामात बिबट्याच्या दहशतीमुळे रात्रीच्या शेतीकामावर धोक्याचे सावट

December 11, 2025
कृषी

🌾 शेतकऱ्यांनी घ्यावा ‘फळ पिक विमा योजने’चा लाभ : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांचे आवाहन

October 13, 2025
कृषी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचे पॅकेज जाहीर

October 7, 2025
Next Post

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved