नांदेड, दि. 19 नोव्हेंबर : (प्रतिनिधी) माधव वाघमारे गोदावरी नदी पात्रातील अवैधर रेतीउपसा करून वाहतूक करणाऱ्यांविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी धडक कारवाई केली आहे. दोन स्वतंत्र छापेमारीत पोलिसांनी तब्बल ₹45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा श्री प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने माहितीच्या आधारे 18 नोव्हेंबर 2025 रोजी सायं. 7 वाजता गोदावरी नदी पात्रात सापळा लावून अवैध रेतीउपसा करणाऱ्यांवर कारवाई केली. रेती चोरून वाहतूक करण्यासाठी लपवून ठेवलेला माल, वाहने व उपकरणे जप्त करण्यात आली.
पोलिस पथकात शेख इब्राहिम, शेख सत्तार, मुखडे सूर्यकांत, चाटे शेख जमीर, शेख आसिफ, धम्मपाल कांबळे या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या प्रकरणात आरोपी
शुभम विठ्ठल सावते (वय 24 वर्षे, रा. आमदुरा, ता. नांदेड)
याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांनी “ऑपरेशन अवैध खनिज” अंतर्गत अवैध रेतीउपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलिसांनी ही प्रभावी कारवाई केली.
नांदेड ग्रामीण पोलीसांचे हे पाऊल अवैध रेतीमाफियांसाठी मोठा धक्का ठरत आहे.












