नांदेड, दि. 13 नोव्हेंबर 2025 : (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड ग्रामीण पोलिसांनी आज सकाळी गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत अवैध रेती उत्खनन प्रकरणात १२ आरोपींना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी रेती चोरीसाठी वापरलेले ट्रक, इंजिन, मोटार आणि रेती असा एकूण ₹1,00,39,400/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई आज सकाळी 5 ते दुपारी 12 वाजेपर्यंत काळेश्वर विष्णुपुरी मार्कंड पिंपळगाव भंगी वाहेगाव गंगाभेट कलर गोदावरी नदीपत्रात व किनाऱ्यावर छापा टाकण्यात आला
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर अप्पर पोलिस अधीक्षक श्री. सुरज गुरव व उपविभागीय पोलीस अधीक्षक इतवारा प्रशांत शिंदे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.
गुन्हा उघड केस आणणारे पोलीस अधिकारी व अंमलदार खालील प्रमाणे
पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व पोलीस उपनिरीक्षक मठवाड पोलीस उपनिरीक्षक उसमे व पोलीस हेच कास्टेबल केंद्रे अर्जुन मुंडे पंचलिंग पवार कल्याणकर लोहारे पैनापल्ले चावरे भिशे समीर शेख जमीर शेख आसिफ धम्मपाल कांबळे सर्व नेमणूक पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण
आरोपींची नावे
कारवाईत बिहार राज्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या १२ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यात मुन्ना विश्राम चौधरी, विकास हरिनाथ सहानी, राजेश चौधरी, निखिलेश नथू बिंद, विजय प्रकाश सहानी, संजीव पूरन बिंद, छोटेलाल हरिनाथ बिंद, अर्जुन रामलखन श्रीराम बिंद आदींचा समावेश आहे.
जप्त केलेला मुद्देमाल
या कारवाईत खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे :
- 7 इंजिन – किंमत ₹21,00,000
- 109 ट्रॅक्टर – किंमत ₹54,50,000
- 3 लोडर – किंमत ₹21,00,000
- 32 लोखंडी टोपल्या – किंमत ₹32,000
- 19 लोखंडी पाईप – किंमत ₹11,400
- 39 लोखंडी साखळ्या – ₹1,17,000
- 45 वाळू रेती – ₹32,25,000
- 11 मोटारी – ₹2,200
- 6 टोपल्या – ₹1,800
एकूण किंमत: ₹1,00,39,400/-
पार्श्वभूमी
नांदेड ग्रामीण हद्दीतील गोविंदवाडी परिसरात अवैध रेती उत्खनन सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी पहाटे छापा टाकून आरोपींना पकडले. आरोपींनी ट्रक व इंजिनच्या सहाय्याने नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी केली होती.
कायदेशीर कारवाई
या प्रकरणी गुन्हा क्र. 1078/2025 भा.दं.वि. कलम 303(2), (3)(5), तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48(7), (8)** अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.
नांदेड ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन करणाऱ्या माफियांमध्ये एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.












