नांदेड ११ प्रतिनिधी माधव वाघमारे
नांदेड ग्रामीण पोलिसांनी खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करून मोठे यश मिळवले आहे. पुयडवाडी(ता. नांदेड) येथे घडलेल्या खुनाच्या प्रकरणात आरोपी अंकुश रामराव पुयड (वय 31, व्यवसाय मजुरी, रा. वडगाव ता. जि. नांदेड) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 109/2026 नोंद असून BNS कलम 103(1), 118(1), 115(2), 189(2), 191(2), 191(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 07 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता पुशवाडी शिवारात नारायण पथुड यांच्या शेतातील घराजवळ ही घटना घडली होती. याबाबत 08 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 04.17 वाजता गुन्हा नोंदविण्यात आला.
मा. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील (भोकर) व श्री. सुरज गुरव (नांदेड) तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत शिंदे (इतवारा) यांच्या नियंत्रणाखाली ‘ऑपरेशन फ्लश आउट’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8.00 वाजता मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, आरोपी हा पुशवाडी येथील तुळण शिवारात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने सापळा रचून त्यास अटक केली. आरोपीला नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचाळकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे तसेच पोलीस कर्मचारी वसंत केंद्रे, मळगे समीर आसिफ पठाण जमीर व कांबळे यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी पकडण्यात यश आले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले आहे.












