नांदेड, दि. 13 ऑक्टोबर 2025 :-
नांदेड जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सदस्यपदासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला असून, या सोडतीचे सविस्तर तपशील उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या कार्यक्रमानुसार आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी नांदेड जिल्हा परिषदेच्या एकूण 65 निवडणूक विभागांची आरक्षण सोडत घेण्यात आली. यानुसार प्रत्येक विभागाचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून, सर्व तालुकानिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे —
🌾 माहूर तालुका
- वाई बु. – सर्वसाधारण
- वानोळा – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
🌾 किनवट तालुका
- सारखणी – अनुसूचित जमाती
- मांडवी – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री)
- गोकुंदा – सर्वसाधारण
- बोधडी बु. – अनुसूचित जमाती (स्त्री)
- जलधारा – अनुसूचित जमाती
- इस्लालपूर – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री)
🌾 हिमायतनगर तालुका
- सरसम (बु.) – अनुसूचित जमाती (स्त्री)
- पोटा बु. – सर्वसाधारण (स्त्री)
🌾 हदगाव तालुका
- निवघा (बा.) – अनुसूचित जाती (स्त्री)
- रूई (धा.) – सर्वसाधारण (स्त्री)
- मनाठा – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री)
- पळसा – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
- आष्टी – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
- तामसा – अनुसूचित जमाती
🌾 अर्धापूर तालुका
- लहान – सर्वसाधारण
- मालेगाव – सर्वसाधारण (स्त्री)
- येळेगाव – सर्वसाधारण (स्त्री)
🌾 नांदेड तालुका
- वाजेगाव – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री)
- वाडी बु. – सर्वसाधारण
- लिंबगाव – अनुसूचित जाती
- धनेगाव – सर्वसाधारण (स्त्री)
- बळीरामपूर – अनुसूचित जाती
🌾 मुदखेड तालुका
- बारड – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
- मुगट – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
🌾 भोकर तालुका
- पाळज – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
- भोसी – अनुसूचित जमाती (स्त्री)
- पिंपळढव – सर्वसाधारण
🌾 उमरी तालुका
- गोरठा – सर्वसाधारण (स्त्री)
- तळेगाव – अनुसूचित जाती
🌾 धर्माबाद तालुका
- करखेली – सर्वसाधारण
- येताळा – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
🌾 बिलोली तालुका
- आरळी – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
- सगरोळी – सर्वसाधारण (स्त्री)
- लोहगाव – सर्वसाधारण
- अटकळी – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री)
🌾 नायगाव (खै.) तालुका
- बरबडा – सर्वसाधारण (स्त्री)
- कुंटूर – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री)
- मांजरम – अनुसूचित जाती (स्त्री)
- नरसी – अनुसूचित जाती (स्त्री)
🌾 लोहा तालुका
- सोनखेड – सर्वसाधारण
- वडेपूरी – सर्वसाधारण (स्त्री)
- उमरा – सर्वसाधारण
- सावरगाव न. – सर्वसाधारण
- कलंबर बु. – सर्वसाधारण (स्त्री)
- माळाकोळी – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री)
🌾 कंधार तालुका
- शिराढोण – सर्वसाधारण
- कौठा – अनुसूचित जाती (स्त्री)
- बहाद्दरपुरा – सर्वसाधारण (स्त्री)
- फुलवळ – सर्वसाधारण (स्त्री)
- पेठवडज – सर्वसाधारण
- कुरूळा – सर्वसाधारण
🌾 मुखेड तालुका
- जांब बु. – अनुसूचित जाती
- चांडोळा – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री)
- एकलारा – सर्वसाधारण
- येवती – अनुसूचित जाती
- सावरगाव पि. – अनुसूचित जाती (स्त्री)
- बा. हाळी – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री)
- मुक्रमाबाद – सर्वसाधारण (स्त्री)
🌾 देगलूर तालुका
- खानापूर – अनुसूचित जाती (स्त्री)
- शहापूर – अनुसूचित जाती
- करडखेड – अनुसूचित जाती (स्त्री)
- मरखेल – सर्वसाधारण (स्त्री)
- हाणेगाव – सर्वसाधारण
या सोडतीमुळे जिल्हा परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघाचे आरक्षण स्पष्ट झाले आहे. याद्वारे महिलांना तसेच अनुसूचित जाती, जमाती व मागासवर्ग प्रवर्गांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.












