नांदेड : ३० ऑक्टोंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
घरकुल योजनेत घोटाळे, लाचलुचपत आणि अकार्यक्षम अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात निर्णायक मोहीम सुरू झाली आहे! नायगाव पंचायत समितीत घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून लाच मागितल्याच्या तक्रारींनंतर, “ऑपरेशन 09.45 AM” नावाने विशेष कारवाई पार पडली होती. त्या ऑपरेशनच्या यशानंतर आता उमरी व धर्माबाद तालुक्यातील अधिकाऱ्यांवरही नजर ठेवली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर आ. श्री. राजेश पवार (विधानसभा सदस्य, नायगाव मतदारसंघ) यांनी जाहीर केले की
घरकुल योजनेत कोणताही अधिकारी, इंजिनिअर किंवा ऑपरेटर लाभार्थ्यांकडून लाच मागत असल्याचे आढळल्यास त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
लाभार्थ्यांचे फोन रिसीव्ह न करणारे, घरकुल हप्ते थांबवणारे किंवा टाळाटाळ करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जात आहे. लाच मागणाऱ्या, गैरप्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात बाळगण्यात येणार कठोर पावले.
नागरिकांना देखील आवाहन करण्यात आले आहे की —
“आपले काम जाणूनबुजून अडवले जात असेल किंवा कोणी लाच मागत असेल, तर त्वरित त्या अधिकाऱ्याचे नाव आणि तपशील आमच्यापर्यंत पोहोचवा.”
ही कारवाई पारदर्शक शासन आणि प्रामाणिक प्रशासनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
भाजपा नायगाव मतदारसंघाच्या वतीने जनतेच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार —
आ. श्री. राजेश पवार व सौ. श्रीमती पवार यांचा पुढाकार.
“घरकुल लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू आहे – ऑपरेशन 09.45 AM!”
लाचखोरी थांबवा, जनतेचा हक्क वाचा!











