नांदेड, दि. ९ ऑक्टोबर – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने गोगावरी नदी पात्रात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोठी कारवाई केली. या कारवाईत अंदाजे ₹30,25,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गु.र.नं. 959/2025 कलम 303(2), भा.दं.सं. सहकलम 48(7), 48(8) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत आरोपी. लक्ष्मण नागोराव माकनकर (चालक) वय 35 वर्ष राहणार देवणेवाडी ता. लोहा जि.नांदेडही कारवाई करण्यात आली.
घटनेचा तपशील असा की, दि. 08.10.2025 रोजी रात्री 10.00 वाजता पोलीसांना माहिती मिळाली की मौजे वाडीपाटी ब्रिज खाली रोडवर नांदेड ते लातूर रोड एक ट्रक अवैधरित्या रेती वाहतूक करत आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. ओमकार चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला असता, एमएच 26 सीएच 7237 क्रमांकाचा ट्रक आढळला. या ट्रकमध्ये सुमारे ₹30 लाख किंमतीची एक पोकळ आणि ₹25 हजार किंमतीची तीन बैलगाडी रेती, असा एकूण ₹30,25,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस हवालदार शेख इब्राहिम, डफडे शेख असिफ शेख जमीर धम्मपाल कांबळे पोलीस आदींचा समावेश होता.
पोलीसांकडून पुढील तपास सुरु असून, अवैध रेती वाहतुकीविरुद्ध अशाच प्रकारच्या कडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती नांदेड ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.












