भोकर: -04/09/2025 मा .श्री. अबिनाश कुमार पोलीस अधीक्षक साहेब नांदेड. यांनी ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत पोस्ट हद्दीततील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक 02/09/2025 पेट्रोलिंग दरम्यान एक इसम हा त्यांचे ताब्यात पिस्टल व काडतूस बाळगून आल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस अधिकारी व आमदार असे रवाना होऊन भोकर ते हिमायतनगर जाणारे रोडवर महादेव पेट्रोल पंपाच्या अलीकडे 50 मीटर अंतरावर रोडच्या बाजूस एक इसम संशयितरित्या थांबलेल्या मिळून आल्याने त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात लोखंडी पिस्टल 05 जिवंत काडतुसे असा एकूण 55000/-रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने लागलीच दोन पंचासमक्ष जप्ती पंचनामा करून तो जप्त करण्यात आला. आरोपी मुद्देमालासह पोलीस स्टेशन भोकर घेऊन येऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी अटक करून मा. न्यायालय समोर हजार केली असून सदर आरोपीची तपासकामी पोलीस कोठडी दिलेली आहे.











