आदेश
नांदेड, दि. 15 सप्टेंबर :- जिल्ह्यात 17 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अनुषंगाने शासकीय ध्वजारोहण समारंभ सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी या काळात कोणताही अनुचित प्रकार घडु नये या दृष्टीकोनातुन नांदेड शहरातील विविध कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी 15 सप्टेंबर 2025 रोजी सायं 6 वाजेपासून ते दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजीचे 24 वाजेपर्यंत उपोषण, आत्मदहन, धरणे, मोर्चा, रॅली, सत्याग्रह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड परिसर, महानगरपालिका कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसिल कार्यालय नांदेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-महात्मा गांधी पुतळा परिसर, पोलीस अधीक्षक कार्यालय, शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय तथा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय रुग्णालय, वजिराबाद नांदेड व परिसर तसेच माता गुजरीजी विसावा उद्यान, शिवाजीनगर नांदेड परीसर आयटीआय चौक ते आण्णाभाऊ साठे चौक, कुसुम सभागृह ते रेल्वेस्टेशन जाणारे रोड, 26 नंबर रोड, शासकीय विश्रामगृह ते एसटी ओव्हर ब्रिज जाणारे रोड या परीसरात शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरीता भारतीय नागरिक सुरक्षा संहीता- 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी 15 सप्टेंबर 2025 रोजी सायं 6 वाजेपासून ते 17 सप्टेंबर 2025 रोजीचे 24 वाजेपर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चा, रॅली, सत्यागृह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध केले आहे.
संबंधीतावर नोटीस बजावुन त्यांचे म्हणने ऐकुन घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहीता- 2023 चे कलम 163 (2) नुसार एकतर्फी आदेश निर्गमीत करण्यात आले आहे.












