नांदेड, दि. २७ ऑक्टोबर – “दक्षता आपली सामाजिक जबाबदारी” या ब्रीदवाक्याखाली ‘दक्षता जनजागृती सप्ताह २०२५’ (Vigilance Awareness Week) चा शुभारंभ आज लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड (एसीबी) तर्फे उत्साहात करण्यात आला. या अभियानाचा उद्देश शासनातील पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि नागरिकांमध्ये भ्रष्टाचारविरोधी जनजागृती निर्माण करणे हा आहे.
या कार्यक्रमाचा प्रारंभ पोलीस उप अधीक्षक श्री. प्रशांत पवार यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमास पोलीस निरीक्षक, कर्मचारी, तसेच नागरिक उपस्थित होते. या आठवड्यात जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग, शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्था यांच्यात विविध जनजागृती उपक्रम राबवले जाणार आहेत.
श्री. पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, “भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी प्रत्येक नागरिकाने दक्षतेचा संकल्प करणे आवश्यक आहे. शासनाने पारदर्शक कार्यपद्धती राबविण्यासाठी नागरिकांची साथ महत्त्वाची आहे.”
या आठवड्यात प्रसार माध्यमांतून, पोस्टर, बॅनर, रॅली, सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे. तसेच आकाशवाणी नांदेड, पोलिस रेडिओ आणि लाचलुचपत विभागाच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यूट्यूब या माध्यमांतूनही माहितीचा प्रसार होईल.
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारदर्शकता व प्रामाणिकपणाचा संकल्प घ्यायला प्रोत्साहित केले जाईल. तसेच नागरिकांना कोणतीही लाच मागितल्यास तत्काळ तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तक्रारीसाठी संपर्क क्रमांक:
📞 पोलीस अधीक्षक संदीप पाळवे – 02462-245429 / मो. 9420464649
📞 अपर पोलीस अधीक्षक अशोक कदम – 02462-245421
📞 पोलीस उप अधीक्षक प्रशांत पवार – मो. 9130464680
📠 टोल फ्री क्रमांक – 1064
📠 नियंत्रण कक्ष – 02462-245427
🌐 Website: www.acbmaharashtra.gov.in
📱 Mobile App: www.acbmaharashtra.net
📘 Facebook: facebook.com/maharashtraACB
🐦 Twitter: @ACBnanded
📸 Instagram: acb_nanded
▶️ YouTube: @AntiCorruptionBureauNanded
कार्यक्रमाचे आयोजन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड यांनी केले असून, नागरिकांनी भ्रष्टाचाराविरुद्ध ठाम भूमिका घेऊन शासनाच्या जनजागृती उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. प्रशांत पवार (पोलीस उपअधीक्षक, नांदेड एसीबी) यांनी केले.












