बोंढार तर्फे नेरली १३ मार्च (प्रतिनिधी: माधव वाघमारे)
नांदेड जिल्ह्यातील ग्रामविकासाला नवी दिशा देण्यासाठी आणि प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सध्या जोमाने राबवले जात आहे. याच अभियानाचा एक विशेष टप्पा म्हणून बोंढार (तर्फे ने.) आय एस ओ ग्रामपंचायत वाचनालय चे उद्घाटन करण्यात आले येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित कलाकारांच्या उपस्थितीने हा सोहळा रंगणार आहे.
मराठी तारकांचा मेळा आणि ‘सुंदर गावा’चा नारा
ग्रामविकासाचा संदेश घराघरांत पोहोचवण्यासाठी लोकप्रिय अभिनेते संदीप पाठक आणि अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर आज, १३ मार्च २०२६ रोजी बोंढार ग्रामस्थांच्या भेटीला येत आहेत. ‘माझे गाव सुंदर गाव हा मंत्र अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी या कलाकारांची उपस्थिती ग्रामस्थांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांची लाभली साथ
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, नांदेड पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी या मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. यामध्ये प्रामुख्याने:
- श्री. प्रवीण सुरडकर (गटविकास अधिकारी, पं.स. नांदेड)
- श्री. व्ही. बी. कांबळे (पंचायत विस्तार अधिकारी)
- श्री. आर. पी. केंद्रे (पंचायत विस्तार अधिकारी)
- श्री. मधुकर मोरे यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
ग्रामपंचायतीची चोख तयारी
सरपंच श्री. मारोती वामन बागल आणि उपसरपंच सौ. राजुबाई व्यंकटराव आरसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बोंढार ग्रामपंचायतीने जय्यत तयारी केली आहे. गावाचा कायापालट करण्यासाठी संपूर्ण ग्रामपंचायत समिती आणि कर्मचारी वर्ग अहोरात्र मेहनत घेत आहेत.
ग्रामपंचायत फळी: - सदस्य: श्री. नवनाथ आरसुळे, सौ. सौमित्राबाई आरसुळे, सौ. नंदाबाई कोकरे, श्री. कैलास आरसुळे, सौ. अनिता बैकते, श्री. शिवाजी शिंदे.
- प्रशासन: श्रीमती एम. आय. ऐनवार (ग्रामपंचायत अधिकारी), श्री. वैभव आरसुळे (कर्मचारी), श्री. सुनील जाधव (ऑपरेटर).
राजकीय संकल्पना आणि विकासाचे ध्येय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी हे अभियान हाती घेतले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार, जयकुमार गोरे आणि योगेश कदम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभियानाद्वारे गावातील स्वच्छता, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण यावर भर दिला जाणार आहे. - परमेश्वर अक्कमवाड यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले












