नांदेड : २२ जानेवारी (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड शहरात 24 व 25 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या VVIP दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 अन्वये नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार (भा.पो.से.) यांनी ही अधिसूचना जारी केली आहे.
या कालावधीत सकाळी 06.00 ते रात्री 22.00 वाजेपर्यंत शहरातील प्रमुख चौक, पूल, अंडरब्रिज व महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक पूर्णतः किंवा टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्यात येणार आहे. VVIP ताफ्याच्या हालचालीदरम्यान काही मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील.
वाहतूक पूर्णतः बंद असणारे प्रमुख मार्ग
- असना ब्रिज – शंकरराव चव्हाण चौक – गुरुद्वारा – मालेगाव रोड – मालेगाव अंडर ब्रिज
- नमस्कार चौक ते नाईक चौक – अण्णाभाऊ साठे पूल – हिंगोली गेट अंडर ब्रिज
- आर.टी.आय. चौक ते अण्णाभाऊ साठे पूल
- अण्णाभाऊ साठे पूल ते नाईक चौक (आनंदनगरकडे जाणारा मार्ग)
- हिंगोली गेट अंडर ब्रिज ते अण्णाभाऊ साठे पूल
- चिखलवाडी ते हिंगोली गेट अंडर ब्रिज
- चिखलवाडी ते गुरुद्वारा – भवानीसिंग चौक
- बसवेश्वर चौक ते जुना मोंढा मार्ग – वजीराबाद
- कविता हॉटेल ते जुना मोंढा कोठ्याकडे जाणारा मार्ग
पर्यायी वाहतूक मार्ग
वाहनचालकांनी पुढील पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे—
- चिखलवाडी ते अण्णाभाऊ साठे पूल मार्गे नाईक चौककडे जाणारी वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – कोटाचे पाठीमागून हिंगोली गेट अंडर ब्रिजमार्गे वळवण्यात येईल.
- अण्णाभाऊ साठे पूल मार्गे जाणारी वाहतूक हि. महादेव दाल मिल रोड नं. 26 कडे वळवली जाईल.
- शिवाजी महाराज पुतळा – रेल्वे स्टेशन – हिंगोली गेट कडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध राहतील.
- बसवेश्वर चौक ते लातूर फाटा तसेच लिंबगाव ते वाडी रोड–हसापुर मार्गे वाहतूक सुरळीत ठेवण्यात येईल.
नागरिकांना आवाहन
वाहनचालकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, पर्यायी मार्गांचा अवलंब करावा व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
VVIP दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी संयम राखून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.












