नांदेड, दि. 10 ऑक्टोबर – नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध नांदेड पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली “सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह” अंतर्गत विविध पथकांनी शहरातील प्रमुख भागांमध्ये विशेष मोहीम राबवून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या इसमांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
सदर मोहिमेअंतर्गत पोलिस उपअधीक्षक अमरेंद्र यांनी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री नांदेड शहरातील विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत पाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ९ आरोपींविरुद्ध कलम ११०/११७ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
१) पोलिस स्टेशन भाग्यनगर :
सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत पोलीस पथकाने पोतनीस/दर्शी येथे कारवाई करत दोन इसमांना ताब्यात घेतले. दोघेही सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालत असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
२) पोलिस स्टेशन विमानतळ :
येथे चालू मोहिमेत दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले. हे दोघेही रस्त्यावरील दुकाने, वाईन शॉप व हॉटेल्सच्या आसपास दारू पिऊन त्रास देत होते. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
३) पोलिस स्टेशन शिवाजीनगर :
येथील पथकाने चालू मोहिमेत एक इसम पकडला. तो सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळला. त्याच्यावर कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
४) पोलिस स्टेशन इतवारा :
येथे दोन इसमांवर कारवाई करण्यात आली. हे दोघेही बसस्थानक परिसरात दारू पिऊन नागरिकांना त्रास देत होते. त्यांच्यावरही कलम ११०/११७ अन्वये कारवाई करण्यात आली.
५) पोलिस स्टेशन वजिराबाद :
वजिराबाद परिसरात देखील दोन इसमांवर कारवाई करण्यात आली. हे दोघे सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचे आढळल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
६) दामिनी पथकाची विशेष कारवाई :
दामिनी पथकाच्या महिला अधिकाऱ्यांनी अमरनगर परिसरात पेट्रोलिंगदरम्यान सात इसमांवर कारवाई केली. हे इसम रस्त्याच्या कडेला दारू पिऊन आवाज करीत होते.
संपूर्ण कारवाईत पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध त्वरित कायदेशीर प्रक्रिया राबवली असून अशा प्रकारच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक अभिनव कुमार यांनी केले आहे. तसेच, शहरातील शांतता व सुरक्षिततेस बाधा पोहोचवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.












