नांदेड (प्रतिनिधी माधव वाघमारे) | दि. 12 फेब्रुवारी
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी स. हरजिंदरसिंघ संधू यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीची घोषणा नांदेड येथील संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत करण्यात आली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. विजयजी सूर्यवंशी साहेब व राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अढांगळे साहेब यांच्या आदेशानुसार ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी भूतपूर्व महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री. शंकरसिंह ठाकूर तसेच राज्य संपर्कप्रमुख व कोअर कमिटी सदस्य श्री. मारोती बा. शिकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे ही निवड प्रक्रिया पार पडली. बैठकीस जिल्हाध्यक्ष श्री. दीपक मठपती यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
ही निवड प्रक्रिया अत्यंत शांत, सुसूत्र आणि सर्वानुमते पार पडली. समाजातील विविध प्रश्नांवर निर्भीडपणे आवाज उठवून पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय्य भूमिका मांडण्याचे कार्य स. हरजिंदरसिंघ संधू करतील, असा ठाम विश्वास यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठवाडा विभागात संघटनेचे कार्य अधिक व्यापक होऊन संघटनेचा लौकिक वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या नियुक्तीसाठी भूतपूर्व राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकूर व कोअर कमिटी सदस्य मारोती शिकारे यांनी विशेष प्रयत्न केल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. बैठकीच्या शेवटी संघटनेच्या वतीने नवनियुक्त अध्यक्ष स. हरजिंदरसिंघ संधू यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.












