नांदेड | ७ फेब्रुवारी प्रतिनिधी माधव वाघमारे
नांदेड शहरात एटीएम फोडून चोरी करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी अवघ्या काही तासांत अटक करून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एटीएम फोडण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य व मोटारसायकल असा एकूण १ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास, पंजाब नॅशनल बँक व कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएम मशीनला लक्ष्य करून आरोपीने फोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ हालचाली करत घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे गुन्हा क्रमांक ६८/२०२६ अन्वये कलम 324(4), 331(4), 305, 62 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार म्हणून पंजाब नॅशनल बँकेचे अधिकारी श्री. नितीन मिसाळ व कोटक महिंद्रा बँकेचे अधिकारी श्री. दत्ता राजनगे यांनी तक्रार दाखल केली आहे.
🔹 अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव :
राम मोहन कुरे (वय २६ वर्षे)
रा. गागलेगाव ता. बिलोली, जि. नांदेड
सध्या मुक्काम – हनुमान मंदिराजवळ, श्रीनगर, नांदेड
🔹 जप्त मुद्देमाल :
- एटीएम फोडण्यासाठी वापरलेले साहित्य
- एक मोटारसायकल
- एकूण किंमत : ₹ १,०६,०००/-
ही यशस्वी कारवाई मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. सौ. अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, भोकर आणि मा. श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत श्री. उदय खंडेराय (पोलीस निरीक्षक), श्री. मिलिंद सोनकांबळे (पोलीस उपनिरीक्षक) तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
नांदेड जिल्ह्यातील वाढते गुन्हे व अवैध कृत्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, अशा कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.












