aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, April 14, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

पंजाबच्या ५० सदस्यीय पथकाचा बोंढार(नेरली) येथे अभ्यास दौरा ग्रामपंचायत बोंढारच्या विकासकामांची पाहणी करून कौतुक

Aawaz Times by Aawaz Times
February 4, 2026
in आपलं नांदेड
0
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ४ फेब्रुवारी (प्रतिनिधी) माधव वाघमारे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व महिला सक्षमीकरण मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या यशस्वी उपक्रमांची माहिती घेण्यासाठी पंजाब राज्यातील ५० सदस्यीय पदाधिकारी पथकाने दि. ३१ जानेवारी रोजी बोंढार(नेरली) (ता. जि. नांदेड) येथे अभ्यास दौरा केला. या दौऱ्याचे आयोजन ग्रामपंचायत बोंढार यांच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी ग्रामपंचायत बोंढार तर्फे बोंढार(नेरली) येथे गुरु गोविंद सिंग महाराज यांच्या प्रतिमेची भेट देऊन पंजाबच्या पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. अभ्यास दौऱ्यादरम्यान ग्रामपंचायतीला मिळालेले आय.एस.ओ. मानांकन, ग्रामपंचायत कार्यालयातील पाणी शुद्धीकरण व्यवस्था, तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे सुस्वर गायन व वाचन पाहून पथकाने समाधान व्यक्त केले.

गावात राबविण्यात येणाऱ्या घर माझी मुलगी माझी शान लेक लाडकी” अभियानांतर्गत प्रत्येक घरावर मुलीचे नाव तसेच पती-पत्नींची नावे लिहिण्याचा अभिनव उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला.
याशिवाय डिजिटल शाळा, डिजिटल अंगणवाडी, रेन हार्वेस्टिंग, शाळेसमोरील परसबाग, सी.सी. कॅमेरे, अंगणवाडी, स्मशानभूमी, सभागृह, महारुद्र हनुमान मंदिर व मंदिर परिसराचे सुशोभीकरण, तसेच पाहुण्यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली.

गावातील घंटागाडी प्लास्टिक संकलन जाळी, कचरा विभाजन (सेग्रीगेशन) शेड नाडेप खड्डा आदी स्वच्छता व पर्यावरणपूरक उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. महिला सरपंच पथकाने संपूर्ण गावाची फेरफटका मारून पाहणी केली. गावातील स्वच्छता, नियोजनबद्ध विकास व सौंदर्यीकरण पाहून पंजाबच्या पथकाने ग्रामपंचायतीच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.

ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, त्यांची अंमलबजावणी व लाभार्थीपर्यंत पोहोच याची सविस्तर माहिती पाहुण्यांनी जाणून घेतली.

या प्रसंगी सरपंच मारोती वामन बागल, उपसरपंच राजूबाई व्यंकटराव आरसुळे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी केरबा शिंदे, कैलास पिराजी आरसुळे, नवनाथ शंकर आरसुळे, सुमित्राबाई चांदु आरसुळे, नंदाबाई देवराव कोकरे, अनिता यशवंत बैकरे, सदस्य देवराव जळबाजी कोकरे, पोलीस पाटील श्री. व्ही. बी. कांबळे, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती एम. आय. ऐनवार, केस तिडके, एम. जी. वाघमारे, मुख्याध्यापक श्रीमती सी. एम. लहाने, सहशिक्षक व्ही. एम. सावंत, एम. ए. राजूरकर, कृषी सहाय्यक संगीता तुकाराम पवार, अंगणवाडी कार्यकर्ती गंगाबाई देविदास पांचाळ, मदतनीस, महिला बचत गट मंडळ, ग्रामपंचायत कर्मचारी व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण अभ्यास दौऱ्यादरम्यान व्ही. बी. कांबळे (पंचायत) विस्तार अधिकारी यांनी समन्वयाची महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.
हा अभ्यास दौरा ग्रामपंचायत बोंढारच्या सर्वांगीण विकासाची प्रभावी ओळख करून देणारा ठरला.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

शिक्षक व शिपाईला लाच घेताना रंगेहात पकडले भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

नांदेड शहरात ATM फोडणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

आपलं नांदेड

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026
आपलं नांदेड

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026
आपलं नांदेड

राज्यात वाहनचालकांच्या कॉल मध्ये नांदेड जिल्हा आघाडीवर एकूण ३,२९५ अर्जांपैकी एकट्या नांदेडचे ४८२ कॉल्स

April 11, 2026
आपलं नांदेड

नांदेड रेल्वे विभागात थर्ड आय सक्रीय एकाच दिवसात ९५४ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई

April 11, 2026
आपलं नांदेड

अहोरात्र सेवा बजावूनही १०२ रुग्णवाहिका चालक उपेक्षित कायमस्वरूपी नोकरी अन् विम्याविनाच सुरू आहे जीवघेणा प्रवास

April 11, 2026
आपलं नांदेड

जनगणनेची अचूक माहिती देऊन राष्ट्रनिर्मितीत सहकार्य करा

April 11, 2026
Next Post

नांदेड शहरात ATM फोडणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन प्रवासी सेवांच्या गुणवत्तेत होणार सुधारणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved