नांदेड, दि. 11 ऑक्टोबर – नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाने वेगवान आणि अचूक कारवाई करत MIDC नांदेड येथील वेअर हाऊसमधील चोरी प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करत त्यांच्याकडून तब्बल 6 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी सायं. 5.30 वाजता ते 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8.30 वाजेदरम्यान MIDC नांदेड येथील वाजपये महालक्ष्मी फुड प्रोडक्ट्स वेअर हाऊसमध्ये चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 958/2025 भादंवि कलम 331(4), 305 नुसार नोंद करण्यात आली होती.
पोलिसांनी तपास सुरू केला असता, गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांवर लक्ष ठेवण्यात आले. अखेर पोलीस निरीक्षक ओंमकांत चिंचोलकर,पोलीस उप नि. ज्ञानेश्वरम मटवाड पोलीस कॉ वसंत केंद्रे, पोलीस कॉ विष्णू कल्याणकर, पोलीस कॉ संतोष पवार, पोलीस कॉ मारुती पचलिंग, गंगलवाड पोलिस पथकाने MIDC परिसरात सापळा रचून आरोपींना पकडण्यात यश मिळवले.
आरोपींची नावे :
- बालाजी किरण गळापडे (वय 42, रा. बाबुळगाव, ता. जि. नांदेड
- विनोद मधुकर कांबळे (वय 34, रा. बळीरामपूर, ता. जि. नांदेड)
- गजानन कचरू पवार (वय 48, रा. ता.हादगाव, जि. नांदेड, सध्या मुक्काम मरडगा, नांदेड)
जप्त मुद्देमाल :
आरोपींकडून 6,50,000 रुपये किंमतीचे चोरीचे साहित्य आणि MH-26-CH-0139 या क्रमांकाची चारचाकी वाहनासह एकूण 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुढील तपास :
या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी गुन्हे उघडकीस आणणाऱ्या पथकाचे कौतुक केले असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणात ग्रामीण गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी ठरली असून त्यांच्या वेळीच आणि दक्षतेने केलेल्या कारवाईमुळे MIDC परिसरातील चोरीचे प्रमाण रोखण्यास मदत झाली आहे.












