नांदेड : देगलूर:- येथे झालेल्या लैडी मन्याड जनसेवा संपर्क कार्यालयाच्या भव्य शुभारंभ प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक तसेच सुमारे 2000 ते 2500 लोकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला जनतेचा प्रचंड सहृदय, भव्य प्रेम-प्रतिसाद मिळाल्याबद्दल आयोजकांनी कृतज्ञता व्यक्त केली. जनतेच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सामाजिक कार्य अधिक जोमाने करण्याची प्रेरणा मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.
“ईश्वर करो माझ्या हातून निरंतर जनसेवा घडो, कुठलाही अहंकार मनाला न लागो” अशी प्रार्थना करत सतत जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहण्याचा संकल्प यावेळी रामदास सुमठाणकर सर यांनी व्यक्त केले.












