📰
नांदेड दि. २ ऑक्टोबर :
दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीनिमित्त नांदेड शहरातील विविध भागातील रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतूक विभागाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ अन्वये काढलेल्या आदेशानुसार ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.०० वा. पासून ते रात्री १२.०० वा. पर्यंत काही रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार असून पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
🚫 वाहतुकीस बंद असलेले मार्ग :
- बरकी चौक ते जुना मोंढा
- जुना मोंढा ते महाकाली चौक – तारसिंग मार्केट – महावीर चौक वजीराबाद– कलामंदिर – शिवाजी नगर – आय.टी.आय. चौक
- राज कॉर्नर – श्रीनगर ते आय.टी.आय. चौक
- राज कॉर्नर ते नवा मोंढा या पर्यंतचा मार्ग
- सिद्धार्थ हायस्कूल हडको ते जुना मोंढा
- जुना मोंढा ते नवा मोंढा
✅ पर्यायी मार्ग :
बरकी चौक हून जुना मोंढा कडे जाणारी वाहने महमूद अल्ली – भाग्यनगर – मोटा खेडा – बाभळगाव – नवा मोंढा मार्गे वापरता येतील.
- राजकॉर्नर मार्गावरील वाहने आनंद नगर – शंकर नगर – धामनगाव – राज कॉर्नरच्या पुढे मार्गे वापरू शकतील.
- खजुरेश्वर चौक – श्रीनगर – वसंतनगर मार्गे वाहतूक वळविण्यात येईल.
- वजीराबाद अंडरब्रिज पुलाजवळून येणारी वाहने तिरंगा चौक – गणेशनगर वळण वापरतील.
- रवी नगर कवठा गोवर्धनघाट पोलीस मुख्यालय लालवाडी अंडर ब्रिज येणारी वाहने – गोकुल नगर – शांती नगर मार्गे वळवली जातील.
- जुना मोंढा मार्गे येणारी वाहने भारत साईनगर तिरंगा चौक – शिवाजीनगर – पिवळी गिरणी – गणेश नगर नवा मोंढा मार्गे वळवण्यात येतील.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, निर्धारित वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
पोलीस अधीक्षक श्री अधीक्षक अविनाश कुमार (IPS) (आदेशित)












