aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, February 26, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, February 26, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक जप्त 40 लाख 25 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Aawaz Times by Aawaz Times
February 11, 2026
in क्राईम
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड |११  प्रतिनिधी  माधव वाघमारे

गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उपसा व वाहतुकीविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत रेती माफियांवर निर्णायक घाव घातला आहे. या कारवाईत एका ट्रकसह सुमारे 40 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 10 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. वांगी ते वाजेगाव बायपास रोडवर पोलिसांनी सापळा रचून संशयित टाटा हायवा ट्रक (MH 26 BE 2878) थांबवला. तपासणीदरम्यान वाहनामध्ये अंदाजे 5 ब्रास अवैध रेती (वाळू) वाहतूक होत असल्याचे आढळून आले.

या प्रकरणात ट्रकची किंमत सुमारे 40 लाख रुपये तर रेतीची किंमत 25 हजार रुपये अशी एकूण 40,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहन चालक सुनील देविदास ताळ (वय 30, व्यवसाय – चालक, रा. वांगी, ता. जि. नांदेड) याच्याविरोधात भा.दं.वि. कलम 303(2), 3(5) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 48(7), 48(8) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील (भोकर), अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव  (नांदेड) व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे (इतवारा) व पो नि ओमकांत चिंचोलकर यांच्या निर्देशनाखाली पार पडली. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांनी संयुक्तपणे ही धडक कारवाई केली.

दरम्यान, अवैध रेती उपसा व वाहतुकीविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे परिसरातील रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

रेल्वे प्रवासात आग टाळा जीव वाचवा नांदेड विभागाकडून अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन

Next Post

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत नांदेड ग्रामीण पोलिसांची ऑपरेशन फ्लश आउट मध्ये मोठी कामगिरी

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

क्राईम

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई चांदीचे दागिन्यांसह दोन गुन्हेगारांना अटक

February 26, 2026
क्राईम

हद्दपार आदेशाचा भंग बळीरामपूरमध्ये संघर्ष पवळे खंजरासह जेरबंद

February 24, 2026
क्राईम

नांदेड विभागात RPF ची मोठी कारवाई

February 23, 2026
क्राईम

नांदेड शहरात वैशिष्ट्यपूर्ण वाहने फटाका बुलेट आणि हुलडबाजी करणाऱ्यांवर धडक कारवाई

February 20, 2026
क्राईम

जालना रेल्वे स्थानकावर आरपीएफची धाड दलालाला अटक प्रवाशांकडून घेतलेले कमिशन जप्त

February 19, 2026
क्राईम

गोदावरी पात्रातील अवैध रेती उपशावर नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

February 18, 2026
Next Post

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत नांदेड ग्रामीण पोलिसांची ऑपरेशन फ्लश आउट मध्ये मोठी कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई चांदीचे दागिन्यांसह दोन गुन्हेगारांना अटक

February 26, 2026

नांदेड-संबलपुर एक्सप्रेसमध्ये तात्पुरती डबे वाढ प्रवाशांना दिलासा

February 26, 2026

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामंडळाचा उद्घाटन सोहळा

February 26, 2026

महाराष्ट्रात मोठा महसूल सुधारणा कायदा लागू NA परवानगी आणि करात ऐतिहासिक बदल

February 25, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • रॉयल स्टे लॉजवर टाकला छापा

    0 shares
    Share 0 Tweet 0
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved