नांदेड | (प्रतिनिधी) माधव वाघमारे
दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी शुक्रवारी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘वीर बाल दिवस’ अत्यंत गौरवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शीख इतिहासातील शौर्य, त्याग व बलिदानाची प्रेरणा देणाऱ्या ‘बाबा जोरावर सिंगजी’ व ‘बाबा फतेह सिंगजी’ यांच्या स्मृतींना यावेळी भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड मा. श्री. शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक नांदेड मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक नांदेड मा. श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक भोकर मा. श्रीमती अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक (गृह) मा. श्रीमती डॉ. अश्विनी जगताप यांच्यासह पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध विभागांचे पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘वीर बाल दिवस’ हा बालवीरांच्या धैर्य, देशनिष्ठा व मूल्यांची जाणीव करून देणारा दिवस असून, भावी पिढीसाठी तो प्रेरणादायी ठरतो, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन पोहेकॉ/हनुमंत पोतदार व नरेंद्र राठोड यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.
या कार्यक्रमामुळे पोलीस दलात देशभक्ती, शौर्य व सामाजिक मूल्यांचा संदेश अधिक बळकट झाला असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.












