नांदेड | प्रतिनिधी : माधव वाघमारे | १६ फेब्रुवारी
नांदेड शहरात झोमॅटो डिलिव्हरी बॉयला लुटणाऱ्या टोळीचा भाग्यनगर पोलिसांनी पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरातील डिलिव्हरी कर्मचाऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 502/2025 अन्वये कलम 310(2), 126(2), 115(2) BNS अंतर्गत हा गुन्हा दाखल होता. सदर गुन्हा १४ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे १.२४ वाजण्याच्या सुमारास घडला होता. मात्र, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
पो नि संतोष तांबे पो नि महेश माळी पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले व पो कॉन्स्टेबल विनोद देशमुख विशाल माळवे गजानन किडे विष्णूकांत मुंडे राजीव घुले पठाण राहुल लाटकर नागनाथ चापके यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपींच्या हालचालींबाबत माहिती मिळाली. त्या आधारे तत्काळ सापळा रचून नांदेड शहर परिसरातून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
अटक केलेले आरोपी
- बुद्धभूषण महाजन गोडबोले (वय 19) – रा. पालिनगर, नांदेड
- पृथ्वीराज राजू खरे (वय 19) – रा. बेलानगर, नांदेड
- विशाल सिद्धार्थ गायकवाड (वय 22) – रा. शंकरनगर, नांदेड (एक विधिसंघर्षग्रस्त बालक)
मुद्देमाल जप्त
आरोपींकडून नगदी २,००० रुपये जप्त करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शन, पथकाचे कौतुक
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक (भोकर) मा. श्रीमती अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक (नांदेड) मा. श्री. सूरज गुरव व उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष नांदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश माळी, तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांनी ही यशस्वी कामगिरी बजावली. या उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांच्या वतीने पथकाचे अभिनंदन करण्यात आले आहे.
शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलीस सतर्क असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशाच कठोर कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.












