नांदेड :४ ऑक्टोंबर
दिनांक ०१/१०/२०२५ रोजी नांदेड पोलिस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार मा.श्री सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत जप्त करण्यात आलेला अमली पदार्थ गांजा व पॉपीस्ट्रॉ पावडर यांची नाशाची कारवाई करण्यात आली.
या कारवाईत –
- गांजा : 105.515 किलो
- पॉपीस्ट्रॉ पावडर : 22.810 किलो
असा एकूण 128.325 किलो अमली पदार्थांचा नाश करण्यात आला.
ही कारवाई न्यायालयीन आदेशानुसार करण्यात आली असून, विशेष पथकाच्या उपस्थितीत संबंधित प्रकरणातील जप्त अमली पदार्थांचा पूर्णतः नाश करून पंचनामा करण्यात आला.
या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड मा. श्री. उदय खंडेराय, पोलिस उप निरीक्षक श्री. माधव केंद्रे तसेच स्थानिक गुन्हे शाखा नांदेड चे पोहे .कॉ. दिलीपकुमार चंचलवार पोहे .कॉ मिलिंद नरबाग रितेश कोलते मनोज राठोड व संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते.
🔹 या कारवाईमुळे नांदेड जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर मोठा आळा बसणार असून पोलिस प्रशासनाकडून अशा कारवाया सातत्याने सुरू राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
👉 ही कारवाई कुंडलवाडी, इतवारा, नांदेड ग्रामीण, नांदेड शहर, देगलूर, मुदखेड या ठाण्यांतील प्रकरणांतर्गत करण्यात आली.












