नांदेड, दि. 10 ऑक्टोबर : नांदेड जिल्हा पोलिस दलातर्फे “मिशन समाधान” या उपक्रमाअंतर्गत नागरिकांच्या तक्रारींचे त्वरीत आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी ‘तक्रार निराकरण दिन’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांवर शनिवार, दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या दिवशी नागरिकांना आपल्या पोलिस ठाण्याशी संबंधित तक्रारी मांडण्याची आणि त्यांचे तत्काळ निराकरण करून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. नांदेड जिल्हा पोलिस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी संबंधित पोलिस ठाण्याला भेट देऊन आपल्या तक्रारींचे निराकरण करावे.
वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असलेले ठिकाण व नावे पुढीलप्रमाणे :
- भाग्यनगर : श्री. अबिनाश कुमार, पोलिस अधीक्षक, नांदेड
- शिवाजीनगर : श्री. सुरज गुरू, अपर पोलिस अधीक्षक, नांदेड
- वजिराबाद : श्री. रमेशर व्यंजने एम, उप विभागीय पोलिस अधिकारी, उप विभाग नांदेड (शहर)
- नांदेड ग्रामीण : श्री. प्रशांत शिंदे, उप विभागीय पोलिस अधिकारी, उप विभाग इटवारा
- कंधार : श्रीमती डॉ. अश्विनी जगताप, उप विभागीय पोलिस अधिकारी, उप विभाग कंधार
- देगलूर : श्री. संकेत गोसावी, उप विभागीय पोलिस अधिकारी, उप विभाग देगलूर
- बिलोली : श्री. श्याम पानेगावकर उप विभागीय पोलिस अधिकारी, उप विभाग बिलोली
- धर्माबाद : श्री. दशरथ पाटील, उप विभागीय पोलिस अधिकारी, उप विभाग धर्माबाद
- भोकर : श्री. दगडू हाके, उप विभागीय पोलिस अधिकारी, उप विभाग भोकर
- किनवट : श्री. रामकृष्ण मळघणे, उप विभागीय पोलिस अधिकारी, उप विभाग किंवत
- माहूर : श्री. किरण भोंडवे, उप विभागीय पोलिस अधिकारी, उप विभाग माहूर
नांदेड जिल्हा पोलिसांनी सांगितले आहे की, “तक्रार निराकरण दिन” हा उपक्रम नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देऊन पोलिस-जनता संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी राबविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आपले प्रश्न मांडावेत आणि प्रशासनाशी थेट संवाद साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












