aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, April 14, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

नांदेडमध्ये हिंद दीbचादरनचा ऐतिहासिक सोहळा सर्वधर्मीय ऐक्याचा जागर  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समाजांचा सहभाग आवश्यक

Aawaz Times by Aawaz Times
January 9, 2026
in आपलं नांदेड
0
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp


(प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड, दि. ९ जानेवारी — शीख धर्माचे नववे गुरु, धर्मस्वातंत्र्य व मानवतेसाठी बलिदान देणारे श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे दिनांक २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य व ऐतिहासिक “हिंद-दी-चादर” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम केवळ धार्मिक नसून सर्वधर्मीय ऐक्य, सामाजिक समरसता व संविधानिक मूल्यांचा जागर करणारा ठरणार असून तो ऐतिहासिक करण्यासाठी सर्व समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मान्यवरांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केले.

सचखंड पब्लिक स्कूल येथील गुरु ग्रंथ साहिब भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर नांदेडचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी, संत ज्ञानी हरनाम सिंगजी, भाई जोसिंदर सिंगजी, भाई राम सिंगजी, भाई कश्मीर सिंगजी, भाई गुरमीत सिंगजी, गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजी, समिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंग, सरजीत सिंग गिल, राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, महेंद्र रायचूरा (धर्म जागरण क्षेत्रीय प्रमुख – पश्चिम क्षेत्र), महंत सुनिल महाराज, महंत जितेंद्र महाराज, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक किशनराव राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग, राज्यस्तरीय समिती तसेच शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकी, उदासीन, भगत नामदेव (वारकरी संप्रदाय) व इतर सर्व समाजांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य कार्यक्रम नांदेड शहरातील मोदी मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी व संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी “हिंद-दी-चादर” या संकल्पनेचे महत्त्व विशद करत गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मिळणारा मानवता, धार्मिक स्वातंत्र्य व सर्वधर्म समभावाचा संदेश अधोरेखित केला. महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासन व विविध समाजांच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यापक व काटेकोर तयारी सुरू आहे. भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी २५ विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक बाबीवर नियोजनबद्ध काम सुरू आहे.

भाविकांसाठी जिल्हानिहाय पार्किंग व्यवस्था, निवासासाठी शाळा, महाविद्यालये व मोकळ्या जागांची उपलब्धता, सुसूत्र वाहतूक व्यवस्था, रेल्वे विभागाच्या सहकार्याने अतिरिक्त सुविधा, लंगर, पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य सेवा यांचा दैनंदिन आढावा घेतला जात आहे. कार्यक्रमस्थळी वैद्यकीय स्टॉल उभारण्यात येणार असून आपत्कालीन सेवाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

तसेच प्रचार-प्रसिद्धीसाठी शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून १५ जानेवारीपासून प्रभातफेऱ्या काढून जनजागृती करण्यात येणार आहे.

राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक म्हणाले की, शहीदी समागम हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो संविधानिक मूल्ये, सामाजिक ऐक्य व मानवतेचा संदेश देणारा ऐतिहासिक उपक्रम आहे. या उपक्रमाची सुरुवात नागपूर येथे यशस्वीरीत्या झाली असून नांदेड येथील दोन दिवसीय कार्यक्रम हा त्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री व मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नांदेडच्या भूमीतून सर्वधर्मीय ऐक्याचा जागर घडवणारा “हिंद-दी-चादर” कार्यक्रम ऐतिहासिक ठरावा यासाठी सर्व समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी शेवटी केले.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड जिल्ह्यात बसस्थानकांवर महिलांच्या दागिन्यांवर डल्ला स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

MPDA अंतर्गत ‘स्थानबद्ध’ कारवाईचा धडाका

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

आपलं नांदेड

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026
आपलं नांदेड

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026
आपलं नांदेड

राज्यात वाहनचालकांच्या कॉल मध्ये नांदेड जिल्हा आघाडीवर एकूण ३,२९५ अर्जांपैकी एकट्या नांदेडचे ४८२ कॉल्स

April 11, 2026
आपलं नांदेड

नांदेड रेल्वे विभागात थर्ड आय सक्रीय एकाच दिवसात ९५४ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई

April 11, 2026
आपलं नांदेड

अहोरात्र सेवा बजावूनही १०२ रुग्णवाहिका चालक उपेक्षित कायमस्वरूपी नोकरी अन् विम्याविनाच सुरू आहे जीवघेणा प्रवास

April 11, 2026
आपलं नांदेड

जनगणनेची अचूक माहिती देऊन राष्ट्रनिर्मितीत सहकार्य करा

April 11, 2026
Next Post

MPDA अंतर्गत ‘स्थानबद्ध’ कारवाईचा धडाका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन प्रवासी सेवांच्या गुणवत्तेत होणार सुधारणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved