नांदेड, दि. 22 सप्टेंबर (प्रतिनिधी)
जबरी चोरी
1) वजिराबाद:
दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9.30 ते 10.00 वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, फिर्यादी निलेश तांबोळे यांच्याकडून दोन इसमांनी दुचाकीवर येऊन एचएफ डिलक्स मोटरसायकल थांबवून जबरीने 30,000 रुपये लुटले. या प्रकरणी वजिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो .उपनि .उत्तम गुट्टे करीत आहेत.
2) बारड:
त्याच दिवशी सकाळी 10.30 वाजता सुमारास बारड फाटा परिसरात मोटारसायकलवर आलेल्या चोरट्यांनी फिर्यादी शंकरराव देवरे यांच्या हातातील पिशवीतील 50,000 रुपये पळवून नेले. बारड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.पुढील तपास पो उपनि. उत्तम बुक्त्तेर करीत आहेत.
फसवणूक
नांदेड ग्रामीण:
दि. 08 ऑगस्ट 2025 रोजी दर्यापूर, गोविंद कॉलनी परिसरात आरोपींनी फिर्यादी नंदकुमार गवाडे यांच्याकडून खोट्या कागदपत्रांच्या आधारे 3,50,000 रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंदवून पुढील तपास पो . उपनि. रेखा काळे करीत आहेत.
जुगार
मिरखेल
दि. 21 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 7.30 वाजता मर्सखेल, माहेरी येथील देवळाजवळ आरोपींनी तीन मोबाईल फोन व 16,200 रुपयांसह जुगार खेळताना पोलिसांनी रंगेहात पकडले. या प्रकरणी मीरखेल पोलिसांत गुन्हा दाखल आहे. पो. कॉन्स्टेबल पाटील करीत आहेत.
🔹 सर्व प्रकरणांचा तपास संबंधित पोलीस ठाण्यांचे पथक करीत असून पुढील चौकशी वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.










