aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, April 14, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्रीडा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात क्रीडा सन्मान सोहळा उत्साहात

Aawaz Times by Aawaz Times
February 25, 2026
in क्रीडा
0
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रतिनिधी : माधव वाघमारे

नांदेड, २५ फेब्रुवारी : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा भव्य गौरव सोहळा आज अधिसभा सभागृहात पार पडला. साउथ-वेस्ट विभागीय, पश्चिम विभागीय तसेच ऑल इंडिया आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून विविध पारितोषिके मिळवून देणाऱ्या खेळाडूंना, प्रशिक्षकांना व संघ व्यवस्थापकांना कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

याच सोहळ्यात नुकत्याच यशस्वीरित्या पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव-२०२५ च्या आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या विविध समित्यांच्या प्रमुखांचाही सत्कार करण्यात आला.

विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात आयोजित या कार्यक्रमात प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नरेंद्र दादा चव्हाण, डॉ. सुर्यकांत जोगदंड, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने यांच्यासह अधिसभा सदस्य डॉ. महेश बेंबडे उपस्थित होते.

कार्यक्रमात ज्युडो, तलवारबाजी, तायक्वांदो, टेबल टेनिस, खो-खो, कबड्डी आणि बास्केटबॉल या क्रीडा प्रकारांमध्ये यश मिळवणाऱ्या खेळाडूंना गौरविण्यात आले. यामध्ये ओम हिंगमिरे, ज्ञानेश्वरी शिंदे, स्वप्नाली घेमुंड, प्रणव अडबलवार, अमिष आठवले, आयुष आठवले, कैवल्य गिरगावकर, तुषार जाधव, ओमकार बारहाते, रामचंद्र झोरे, शुभम थोरात, शुभम उत्तेकर, ओमकार सोनवणे, निहार दुबे, सौरभ अडवकर, संकेत सुपेकर, प्रेम रणदिवे, नितीन खटिंग, शुभम शिगवण, सोफिया शेख, अनिकेत चीद्रावार, ज्ञानेश्वर कावळे, गजानन भालटकर, गणेश कचकुळे, दत्ता शिंदे, सागर गायकवाड, आकांक्षा राठोड, गौरी दाहे, आरती शहा, प्रेक्षा पाटील, अमृता दिवसे, अनुराधा जाधव, अरुणा पोवार, प्राची लोहार, सानिका पाटील, सानिका संजय पाटील, संध्या पिंपळे, गीता तुरे, प्रगती कांबळे, साक्षी समसापुरे, कांचन सूर्यवंशी, मुक्ताई राऊत, नम्रता पवार, वैष्णवी जाधव, राधा कांबळे, प्रीती धनगेर, साधना पवार, प्रांजल मुगळे, ज्योती पवार, लक्ष्मी राठोड, सपना पैठणे, राजेश्वरी वाघमारे, गायत्री वाघ आणि पल्लवी पुतळे या खेळाडूंचा समावेश होता. तसेच संबंधित प्रशिक्षक व संघ व्यवस्थापकांनाही यावेळी गौरविण्यात आले.

याप्रसंगी डॉ. महेश वाकरडकर, डॉ. मीनानाथ खोमचाळे, डॉ. तातेराव केंद्रे, डॉ. सचिन चामले, डॉ. पवन पाटील, डॉ. अशोक वाघमारे यांच्यासह अनेक प्राचार्य व क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रातील वाढत्या यशाचा गौरवशाली टप्पा ठरला.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

कायदा व सुव्यवस्थेसाठी नांदेड जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू

Next Post

महाराष्ट्रात मोठा महसूल सुधारणा कायदा लागू NA परवानगी आणि करात ऐतिहासिक बदल

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

क्रीडा

महसूल क्रीडा स्पर्धेत नांदेडचा झेंडा सलग सर्वसाधारण विजेतेपद पटकावत आपली परंपरा राखली

April 7, 2026
क्रीडा

स्वारातीम’ विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेचा थरार

March 30, 2026
क्रीडा

🌾 जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची खडकूत येथे पीक कापणी प्रयोगाची पाहणी 🌾

October 3, 2025
क्रीडा

नांदेड जिल्ह्यात जबरी चोरी, फसवणूक व जुगार प्रकरणे उघड

September 22, 2025
आपत्तीग्रस्तांना मदत व पुनर्वसनाची कार्यवाही तत्परतेने करणार : पालकमंत्री अतुल सावे
आपलं नांदेड

आपत्तीग्रस्तांना मदत व पुनर्वसनाची कार्यवाही तत्परतेने करणार : पालकमंत्री अतुल सावे

September 2, 2025
मुंबईत डेंग्यू व चिकनगुनियाचा प्रकोप; आरोग्य विभागाची मोहीम आणि नागरिकांची काळजी आवश्यक
आपलं नांदेड

मुंबईत डेंग्यू व चिकनगुनियाचा प्रकोप; आरोग्य विभागाची मोहीम आणि नागरिकांची काळजी आवश्यक

September 2, 2025
Next Post

महाराष्ट्रात मोठा महसूल सुधारणा कायदा लागू NA परवानगी आणि करात ऐतिहासिक बदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन प्रवासी सेवांच्या गुणवत्तेत होणार सुधारणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved