aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Monday, March 23, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Monday, March 23, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home देश-विदेश

मध्यपूर्व तणावादरम्यान भारतीय नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाचा ‘सतर्कता इशारा ११ देशांतील हेल्पलाइन जारी

Aawaz Times by Aawaz Times
March 1, 2026
in देश-विदेश
0
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp


प्रतिनिधी, माधव

मुंबई नांदेड १ मार्च मध्यपूर्व व परिसरातील वाढत्या प्रादेशिक तणावामुळे तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने मोठी खबरदारी घेतली आहे. केंद्र सरकारच्या संबंधित दूतावासांनी जारी केलेल्या सुरक्षा सल्ल्यानंतर राज्य शासनाने आपल्या नागरिकांसाठी ‘सतर्क राहा’ असे आवाहन जारी केले आहे.

पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवैत, बाहरीन, मस्कत (ओमान), जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथील सर्व भारतीयांनी तातडीने सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची राजकीय आणि लष्करी हालचाली सुरू असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

स्थानिक प्रशासन आणि दूतावासांच्या सूचनांचे पालन करा
महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनात म्हटले आहे की, स्थानिक प्रशासन तसेच त्या-त्या देशातील भारतीय दूतावासांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास शांतता व संयम राखून त्वरित भारतीय दूतावासांशी संपर्क साधावा.

राज्य शासन केंद्र शासन आणि संबंधित देशांतील आपल्या राजनैतिक यंत्रणेशी सातत्याने समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी
तातडीच्या मदतीसाठी संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे २४x७ हेल्पलाइन क्रमांक खालीलप्रमाणे जारी करण्यात आले आहेत.

· रामल्लाह (पॅलेस्टाईन): +970592916418, ईमेल: repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in
· दोहा (कतार): 00974-55647502, ईमेल: cons.doha@mea.gov.in
· रियाध (सौदी अरेबिया): 00-966-11-4884697, WhatsApp: 00-966-542126748, टोल फ्री: 800 247 1234, ईमेल: cw.riyadh@mea.gov.in
· तेल अवीव (इस्रायल): +972-54-7520711 / +972-54-2428378, ईमेल: cons1.telaviv@mea.gov.in
· तेहरान (इराण): +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359
· अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात): टोल फ्री: 800-46342, WhatsApp: +971543090571, ईमेल: pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in
· कुवैत: +96565501946, ईमेल: community.kuwait@mea.gov.in
· बाहरीन: 00973-39418071
· मस्कत (ओमान): टोल फ्री: 80071234, WhatsApp: +96898282270, ईमेल: cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in
· जॉर्डन: 00962-770 422 276
· बगदाद (इराक): +964 771 651 1185 / +964 770444 4899, ईमेल: cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in, वेबसाइट: eoibaghdad.gov.in

ही माहिती मुख्यमंत्री कार्यालय, महाराष्ट्र यांच्या अधिकृत X हँडलवरून जारी करण्यात आली आहे.


Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

शहाजी उमाप यांच्या पथकाचा नांदेड-परभणीत धडाका मटका आणि जुगार अड्ड्यावर छापे २५ आरोपी अटकेत

Next Post

सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्या ६ जणांवर कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

देश-विदेश

आखाती देशांतील नांदेडकर सुरक्षित पन्नास जणांचा समावेश

March 3, 2026
देश-विदेश

मुंबई पुणे बुलेट ट्रेन अवघ्या 48 मिनिटांत 132 स्थानकांचे होणार कायापालट

February 2, 2026
आपत्तीग्रस्तांना मदत व पुनर्वसनाची कार्यवाही तत्परतेने करणार : पालकमंत्री अतुल सावे
आपलं नांदेड

आपत्तीग्रस्तांना मदत व पुनर्वसनाची कार्यवाही तत्परतेने करणार : पालकमंत्री अतुल सावे

September 2, 2025
मुंबईत डेंग्यू व चिकनगुनियाचा प्रकोप; आरोग्य विभागाची मोहीम आणि नागरिकांची काळजी आवश्यक
आपलं नांदेड

मुंबईत डेंग्यू व चिकनगुनियाचा प्रकोप; आरोग्य विभागाची मोहीम आणि नागरिकांची काळजी आवश्यक

September 2, 2025
पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या ६६ नागरिकांना सुखरूपपणे काढले बाहेर; होमगार्ड जवानांनी लावली जीवाची बाजी
आपलं नांदेड

पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या ६६ नागरिकांना सुखरूपपणे काढले बाहेर; होमगार्ड जवानांनी लावली जीवाची बाजी

September 2, 2025
Next Post

सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्या ६ जणांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्रात गुटखा माफियांवर खाकीचा दणका

March 22, 2026

मुक्राबाद पोलिसांची मोठी कारवाई २२ लाखांच्या मुद्देमालासह तिरट जुगारावर छापा

March 21, 2026

भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई

March 21, 2026

काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेस आता श्री गंगानगरपर्यंत धावणार प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेचा मोठा निर्णय

March 20, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • रॉयल स्टे लॉजवर टाकला छापा

    0 shares
    Share 0 Tweet 0
March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved