aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

शहाजी उमाप यांच्या पथकाचा नांदेड-परभणीत धडाका मटका आणि जुगार अड्ड्यावर छापे २५ आरोपी अटकेत

Aawaz Times by Aawaz Times
March 1, 2026
in क्राईम
0
0
SHARES
76
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रतिनिधी: माधव वाघमारे

नांदेड/परभणी, दि. १ फेब्रुवारी: नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिल्या होत्या. यानुसार कारवाई करताना पोलीस पथकाने नांदेड शहरातील मटका बुक्कीवर छापा टाकून सात जणांना अटक केली तर परभणी जिल्ह्यातील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून अठरा जणांना ताब्यात घेतले आहेत. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण २५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भाग्यनगरमध्ये मटका बुक्कीवर कारवाई
पहिली कारवाई दिनांक २७ फेब्रुवारी रोजी नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. छत्रपती चौकातील आर.एम.आर. कॉम्प्लेक्समध्ये पोलिसांनी छापा टाकून मटका बुक्कीवर कारवाई केली. या ठिकाणाहून पोलिसांनी २४,३३० रुपयांची रोकड, ३० हजार रुपये किंमतीचे ४ मोबाईल, १० हजार रुपयांचा लेनोवो कंपनीचा टॅब आणि १५ हजार रुपयांचे इतर साहित्य असा एकूण ७९,३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ७ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०६/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम ४, ५, १२ (अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास भाग्यनगर पोलीस ठाण्याचे सपोउपनि रावसाहेब जाधव करत आहेत.

लिमला येथील क्रिडा मंडळावर छापा, जुगार खेळताना १८ जण ताब्यात
दुसरी मोठी कारवाई आज दिनांक २८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. मौजे लिमला येथील राजकला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ येथे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी तेथे जुगार खेळताना आढळलेल्या १८ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २०,९०० रुपयांची रोकड आणि २ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.

तपासात हे क्रिडा मंडळ मूळचे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव येथे नोंदणीकृत असल्याचे उघडकीस आले. या मंडळाची प्रशिक्षण शाखा लिमला येथे चालवल्याचे मॅनेजर कैलास शिंदे यांनी सांगितले. मात्र, संबंधित अभिलेख ते पोलिसांना दाखवू शकले नाहीत. अधिक तपासात या जुगार अड्ड्यावर देशी दारू आणि तंबाखूजन्य पदार्थही विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे आढळून आले.

याप्रकरणी आरोपींविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम ४, ५, मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ६५ (इ) तसेच सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने कायदा २०२३ चे कलम ६ (ब) व २४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास ताडकळस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सतीश तावडे करत आहेत.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोहेकॉ प्रदीप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड, पोकॉ गणेश धुमाळ आणि पोकॉ कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी या कारवाईबद्दल पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर तसेच ‘खबर’ हेल्पलाइन क्रमांक 91 50 100 100 वर कळवून अशा गोष्टींचा बिमोड करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड रल्वेची मोठी कामगिरी

Next Post

मध्यपूर्व तणावादरम्यान भारतीय नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाचा ‘सतर्कता इशारा ११ देशांतील हेल्पलाइन जारी

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post

मध्यपूर्व तणावादरम्यान भारतीय नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाचा ‘सतर्कता इशारा ११ देशांतील हेल्पलाइन जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved