नांदेड (प्रतिनिधी) १ ऑक्टोंबर
🔴 1) खुनाचा प्रयत्न – भोकर
29 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वा. मौ. थेरबन ता. भोकर येथे आरोपी १ बळीराम बालाजी उपलवार रा. तळेगाव ता.उमरी २ गोविंद मारुती राजूरे रा. बोळसा ता.मोधोळ जि.निर्मल बळीराम बालाजी उपलवार हा नेहमी दारू पिऊन गावातील लोकांना त्रास देऊ लागल्याने त्रासाला कंटाळून त्यांचा गळ्यातील दस्तीने त्याचा गळा आवळून डोक्यात व डाव्या हातावर मारून गंभीर जखमी करून फोन करण्याचा प्रयत्न केला तरी पंडितराव हाके वय 35 राहणार थेरबन तालुका भोकर जिल्हा नांदेड यांच्यावर जीवघेणा हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
🔴 2) घरफोडी – माळकोळी
30 सप्टेंबर रोजी रात्री 1 ते 3 या वेळेत माळकोळी शिवारात चोरट्यांनी घरफोडी करून 1.5 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम मिळून अंदाजे 32 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेत चार गावठी सोनेरी दागिने आणि 15 हजार रुपये रोख रक्कम लंपास करण्यात आली. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🔴 3) अवैध गुटखा बाळगला – इस्लापूर
29 सप्टेंबर रोजी रात्री 7.10 वा. इस्लापूर शिवारात हनुमंत विश्वनाथ बेहरे (वय 42) याच्याकडे तपासादरम्यान 5 लाख 10 हजार रुपयांचा गुटखा व मावा सापडला. पोलिसांनी तत्काळ जप्तीची कारवाई केली असून संबंधिताविरुद्ध इस्लापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
🔴 4) भारतीय हत्यार कायदा –
30 सप्टेंबर रोजी दुपारी 12.05 वा. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे प्रभाकर गंगाधर शिंदे (वय 37) याच्याकडे बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळले. पोलिसांनी तत्काळ शस्त्र जप्त करून आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
🔴 5) कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या – अर्धपूर
29 सप्टेंबर रोजी रात्री 10 वा. अर्धपूर तालुक्यातील मयत निवृत्ती सखाराम कदम (वय 55) या शेतकऱ्याने कर्जाच्या व आर्थिक अडचणीमुळे घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.
👉 नांदेड पोलिसांनी या सर्व प्रकरणांमध्ये तपासाची गती वाढवली असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे.












