प्रतिनिधी माधव वाघमारे
नांदेड : २४ फेब्रुवारी प्रामाणिक पोलिसांनी हद्दपार करण्यात आलेल्या एका इसमाविरुद्ध कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायदा व शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या ‘ऑपरेशन फ्लश आउट’ अंतर्गत हद्दपार इसमांची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या आदेशान्वये करण्यात आली.
पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बळीरामपूर येथील रहिवासी असलेल्या संघर्ष सुनिल पवळे (वय 25, व्यवसाय बोकार) याला उपविभागीय दंडाधिकारी, नांदेड यांनी 22 डिसेंबर 2025 रोजी कलम 56 (1)(ब) महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत सहा महिन्यांसाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार केले होते. मात्र, या आदेशाचा भंग करून तो पुन्हा जिल्ह्यात शिरला असून बळीरामपूर परिसरात लपून राहत असल्याची गोपनीय माहिती नांदेड प्रामाणिक पोलिसांना मिळाली.
याबाबत पोलीस निरीक्षकओंमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2.15 वाजता पंचिशील चौक, बळीरामपूर येथे संघर्ष पवळे याला तपासणीसाठी रोखले असता त्याच्याकडे एक धारदार खंजर आढळून आला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व्यंकटराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संघर्ष पवळे याच्याविरुद्ध नांदेड प्रामाणिक पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 163/2026 अन्वये कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायदा व कलम 4/25 शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सायंकाळी 3.20 वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केल्याबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कारवाई करणाऱ्या पथकाचे कौतुक केले आहे. या पथकात पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकटराव, पोलीस कर्मचारी वर्षा केदारे (क्रं. 273), मारोती पाचपुते (क्रं. 599), समीर शेख (क्रं. 3224) यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल क्रं. 1628 हे करत आहेत.












