aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, April 14, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

गोदावरीच्या पात्रात अवैध रेती उपसा नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई १० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
February 17, 2026
in क्राईम
0
0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp


प्रतिनिधी : माधव वाघमारे
नांदेड | दि. १७ फेब्रुवारी २०२६

गोदावरी नदीच्या पात्रात बेकायदेशीररीत्या रेती उपसा व वाहतूक करणाऱ्या रेती माफियांविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’ अंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली.

गोदावरी नदी पात्रातील मार्कंड शिवरात दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ छापा टाकला. कारवाईदरम्यान नदी पात्रातून अवैधरीत्या रेती काढत असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी घटनास्थळी अंदाजे ५ ब्रास रेती (किंमत २५ हजार रुपये), एक जेसीबी (३ लाख रुपये) व एक ट्रॅक्टर-ट्रॉली (७ लाख ५० हजार रुपये) असा एकूण १०.७५ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी बाबुराव श्रीसागर बालाजी केशवराव लामदाडे (वय २३, व्यवसाय – शेती), मदन येवले (रा. मार्कंड) तसेच दोन इतर अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींवर भादंवि कलम ३०३(२), ३(५) सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षकअबिनाश कुमार नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील भोकर व नांदेड, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा प्रशांत शिंदे यांच्या देखरेखीखाली पो नि ओमकांत चिंचोलकर पो कॉन्स्टेबल विठ्ठल शिंदे आसिफ जमीर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

नांदेड जिल्ह्यात अवैध रेती उपसा व वाहतुकीविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

Tags: aawaztimesCES 2017
ShareSend
Previous Post

परीक्षा शिस्तीचा आदर्श ठरले लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय जिल्हाधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त

Next Post

जनसामान्यांचे खंबीर नेतृत्व  शंकरसिंह ठाकूर

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

क्राईम

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026
क्राईम

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026
क्राईम

दामिनी पथकाची मोठी कामगिरी

April 11, 2026
क्राईम

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन फ्लश आऊट ५ दिवसांत ९७ सराईत गुन्हेगारांवर कारवाई

April 11, 2026
क्राईम

नांदेड पोलिसांचे शहरात धाडसी कोंबिंग ऑपरेशन ४ दिवसांत ८८ सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

April 10, 2026
क्राईम

धर्माबाद पोलिसांची मोठी कारवाई दुचाकी चोरट्यास अवघ्या काही तासांत ठोकल्या बेड्या

April 9, 2026
Next Post

जनसामान्यांचे खंबीर नेतृत्व  शंकरसिंह ठाकूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन प्रवासी सेवांच्या गुणवत्तेत होणार सुधारणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved