नांदेड २३ सप्टेंबर ( प्रतिनिधी – माधव वाघमारे) जिल्ह्यातील बेकायदेशीर आणि अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या थेट आदेशानुसार २२ सप्टेंबर २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात व्यापक स्वरूपात विशेष मास रेड (Mass Raid) मोहीम राबवण्यात आली. या धाडसत्रात पोलिसांनी २६ लाख १२ हजार २३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ५४ आरोपींवर कायदेशीर कारवाई करत एकूण ३६ गुन्हे दाखल केले आहेत.
शहरी व ग्रामीण भागात एकाच वेळी कारवाई या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी समन्वयाने काम करत एकाच दिवशी शहर तसेच ग्रामीण भागातील संशयित ठिकाणांवर धाडी घातल्या. यात दारूबंदी, मटका, जुगार, गुटखा आणि बेकायदेशीर वाळू/रेती वाहतुकीवर प्रभावी कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या अचानक झालेल्या धडक कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
कारवाईचा सविस्तर तपशील:
कारवाईचे शीर्षकदाखल गुन्हेआरोपीजप्त मुद्देमाल (₹) मटका / जुगार कारवाई५२३ ₹ ३,०४,७९०/- दारूबंदी कारवाई २९२९ ₹ १,८३,६७०/- गुटखा कारवाई १०१ ₹ १,०३,७७४/- रेती (वाळू) कारवाई०१०१₹२०,२०,०००/- एकूण३६५४₹२६,१२,२३४/-
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही धडक मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशावरून, अपर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायद्याचे राज्य अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबवल्या जातील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. तसेच जिल्ह्यातील कोणत्याही अवैध व्यवसायाबाबत नागरिकांनी न घाबरता निर्भयपणे स्थानिक पोलीस ठाण्यात अथवा ‘डायल ११२’ वर माहिती देऊन सहकार्य करावे












