नांदेड २३ सप्टेंबर(प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शिवरोडवरील संकेतनगर पाटीजवळ रस्त्यावर सुरू असलेल्या ‘तिरट’ जुगार अड्ड्यावर पहाटेच्या सुमारास अचानक छापा टाकून ६ जुगार्यांना रंगेहात ताब्यात घेतले आहे. या कारवाईत रोख रकमेसह वाहने आणि मोबाईल असा एकूण ३,०६,९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अशी झाली कारवाई:
दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे भाग्यनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक सरकारी वाहनाने गस्त घालत असताना, गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शिवरोडवरील संकेतनगर पाटीजवळ काही व्यक्ती सार्वजनिक रस्त्यावर लाईटच्या उजेडात विनापरवाना बेकायदेशीररीत्या पैशांवर ‘तिरट’ नावाचा जुगार खेळत व खेळवत आहेत. या खात्रीशीर माहितीवरून पोलिसांनी दोन पंचांसमक्ष घटनास्थळी अचानक छापा टाकला असता ६ इसम पैशांची बाजी लावून जुगार खेळताना आढळून आले.
ताब्यात घेतलेले आरोपी:
१) दीपक सुभाष येवतीकर (वय ३० वर्षे, व्यवसाय: मार्केटिंग, रा. निलेश्वरी कॉलनी, शिवरोड, नांदेड) २) विनोद किशनराव खांडरे (वय ३९ वर्षे, व्यवसाय: व्यापार, रा. स्वस्तिकनगर, शिवरोड, नांदेड) ३) ओमकार बालाजी बैनवाड (वय २७ वर्षे, व्यवसाय: इंजिनीअर, रा. मंत्रीनगर, नांदेड) ४) सचिन अशोक नागरगोजे (वय ४५ वर्षे, व्यवसाय: मजुरी, रा. निलेश्वरी कॉलनी, शिवरोड, नांदेड) ५) शशांक लक्ष्मण गबाळे (वय २४ वर्षे, व्यवसाय: शिक्षण, रा. निलेश्वरी कॉलनी, शिवरोड, नांदेड) ६) विनायक मधुकर मिरकुटे (वय २६ वर्षे, व्यवसाय: शिक्षण, रा. खंडोबा चौक, नांदेड)
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
- नगदी रक्कम: ₹६,९३०/- रोख
- मोबाईल: विविध कंपन्यांचे ६ मोबाईल
- वाहने: ३ दुचाकी (ॲक्टिव्हा स्कूटी क्र. MH-26-BP-8321, होंडा शाईन क्र. MH-26-AN-6192, होंडा युनिकॉर्न क्र. MH-26-VH-9104)
- इतर: बदक छाप जुगाराचे पत्ते (एकूण जप्त मुद्देमाल किंमत: ₹३,०६,९३०/-)
गुन्हा दाखल व पोलीस पथक:
सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५४४/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही धडक कारवाई मा. डॉ. निलाभ रोहन (पोलीस अधीक्षक, नांदेड) व मा. सुरज गुरव (अपर पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली, भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोनि/ संतोष तांबे, पोलीस उपनिरीक्षक/ विनोद देशमुख आणि त्यांच्या पथकातील अंमलदार पवार, विष्णुकांत मुंडे, चापके, काष्टेवाड, साळवे व होमगार्ड कदम यांनी पार पाडली.
पोलीस प्रशासनाचे आवाहन: नांदेड जिल्ह्यात अवैध जुगार, मटका व इतर बेकायदेशीर प्रकारांविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू असून, नागरिकांनी अशा अवैध हालचालींची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.











