aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, September 23, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
September 18, 2026
in क्राईम
0
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

(प्रतिनिधी माधव वाघमारे) १८ सप्टेंबर नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत धर्माबाद पोलीस स्टेशन पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा (स्थागुशा), नांदेड यांनी धर्माबाद शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून बेकायदेशीर ऑनलाईन व मटका जुगार अड्ड्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण ५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ८१,७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पहिली कारवाई (चुंगी नाका परिसर): दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी चुंगी नाका भागातील एका दुकानात संगणकावर ‘ऑनलाईन राजश्री लॉटरी’ नावाचा बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांनी तातडीने छापा मारून आरोपी महंमद असिफ पि. महंमद अन्वर (वय ३८, रा. सरस्वतीनगर, धर्माबाद), संतोष नागोजी पबतवार (वय ४२, रा. बाळापुर, धर्माबाद) आणि साईनाथ उर्फ अंजु बालेमवार (रा. देवीगल्ली, धर्माबाद) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून संगणक, प्रिंटर, रोकड व जुगाराचे साहित्य असा एकूण ७०,३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात गु.र.क्र. २२५/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दूसरी कारवाई (रामनगर परिसर): दुसऱ्या घटनेत रामनगर भागातील मोकळ्या जागेत ‘श्रीदेवी, मेन बाजार, कल्याण, कल्याण नाईट’ नावाचा मटका जुगार चालवला जात असल्याची गुप्त माहिती धर्माबाद पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून अजय उर्फ राजू गंगाधर गाजेवार (रा. सहारा कॉलनी, धर्माबाद) व शेख सज्ज (रा. बिलोली) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक मोबाईल फोन, रोकड व मटका साहित्य असा ११,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गु.र.क्र. २२६/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदर दोन्ही कारवाया पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुकडे स पो उपनि दारासिंग राठोड पोलीस अंमलदार कुमरे, सय्यद अलिम, हाक्के, पिंगलवाड आणि चाटे यांच्या पथकाने पार पाडली. नागरिकांनी आपल्या परिसरातील बेकायदेशीर हालचालींची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

Next Post

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
बनावट कागदपत्रांच्या आधारे एकाच जमिनीची परस्पर वारंवार विक्री करून कोट्यवधी रुपयांना गंडा
क्राईम

बनावट कागदपत्रांच्या आधारे एकाच जमिनीची परस्पर वारंवार विक्री करून कोट्यवधी रुपयांना गंडा

September 16, 2026
Next Post
मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved