नांदेड /प्रतिनिधी २२ सप्टेंबर
नांदेड शहरातील तरोडा नाका परिसरातील ‘गंगा स्पा’ सेंटरवर पोलिसांनी धडक कारवाई करत स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून ३ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
बनावट ग्राहक पाठवून रचला सापळा नांदेड शहरातील अनैतिक मानवी व्यापारास आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत दि. २१/०९/२०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकास तरोडा नाका, चंदनानी कॉम्प्लेक्स येथील ‘गंगा स्पा सेंटर’मध्ये अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली.
माहितीची खात्री करण्यासाठी पोलीस पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून नियोजनबद्ध सापळा रचला. बनावट ग्राहकाने स्पा सेंटरमध्ये जाऊन खात्री केल्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ तेथे छापा टाकला.
मालकाविरुद्ध गुन्हा दाखल छाप्यादरम्यान पोलिसांनी ३ पीडित महिलांची (नांदेड व त्रिपुरा येथील) सुटका केली. चौकशीत स्पा सेंटरचा मालक आरोपी रोहित श्रीराम ढगे (वय २६ वर्ष, रा. श्रीपाद नगर, नांदेड) याने मसाज व स्पा सर्व्हिसच्या नावाखाली या महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे समोर आले.
पोलीस कारवाईत आरोपीकडून विविध कंपन्यांचे मोबाईल फोन, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण ₹२७,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपी रोहित ढगे याच्याविरुद्ध पोलीस ठाणे भाग्यनगर येथे गु.र.नं. ५४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १४३(३), ३(५) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम ४, ५ व ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केली कारवाई ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक मा. सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली:
- पोनि/ अतुल भोसले (स्थानिक गुन्हे शाखा)
- पोनि/ महेश माळी (भाग्यनगर)
- पोउपनि/ अश्विनी गायकवाड
- पोलीस अंमलदार रितेश कुलथे, गणेश लोसरवार, ज्ञानोबा कवठेकर, अच्युत मोरे आणि महिला पोलीस अंमलदार यशोदा केंद्रे यांनी पार पाडली.
पोलीस प्रशासनाचे आवाहन अनैतिक मानवी व्यापार किंवा वेश्याव्यवसायासाठी महिलांचे शोषण अथवा अशा प्रकारचे अवैध व्यवसाय परिसरात सुरू असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ नांदेड पोलिसांना किंवा डायल ११२ वर माहिती द्यावी
प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड












