नांदेड | प्रतिनिधी : माधव वाघमारे | दि. 17 फेब्रुवारी 2026
सृष्टीच्या नियमाने जग चालते; मात्र निसर्गाची साथ नसतानाही प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, परिश्रम, कष्ट आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सक्षमपणे उभे राहिलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे शंकरसिंह ठाकूर. ग्रामीण भागातून येत, संघर्षाला कवेत घेऊन समाजकारण व पत्रकारितेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे ठाकूर सर आज जनसामान्यांच्या नेतृत्वाचे प्रतीक ठरले आहेत.
कंधार तालुक्यातील ग्रामीण परिसरातून आलेल्या ठाकूर सरांनी प्रतिकूल परिस्थितीत आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. पुढे काही काळ खाजगी नोकरी केली. त्यानंतर नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत त्यांनी अनेक वर्षे सेवा बजावली. मात्र बँकेच्या अडचणींमुळे व मनाविरुद्ध मर्यादांमध्ये काम करण्याची घुसमट जाणवत असल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. “स्वतंत्र निर्भीड मत मांडता येईल, समाजासाठी काहीतरी करावे,” या ध्यासातून त्यांनी पत्रकारितेचा मार्ग स्वीकारला.
नांदेड येथे येऊन दैनिकांमधून पत्रकारितेला सुरुवात करताना वाट सोपी नव्हती. तरीही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी विविध दैनिकांमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. पुढे स्वतःचे दै. वीर शिरोमणी हे वर्तमानपत्र सुरू करून सामाजिक प्रश्न, जनतेच्या समस्या, उपक्रम, लेखमालिका यांच्या माध्यमातून लेखणीद्वारे न्याय मिळवून देण्याचे कार्य सुरू केले.
अशोकदादा वायवळ यांच्या माध्यमातून एका कार्यक्रमात सहभागी होत असताना शंकरसिंह ठाकूर यांचा पुरोगामी पत्रकार संघ (भारत) परिवाराशी संपर्क आला. सहा वर्षांपूर्वी ते संघात सामील झाले. संस्थापक अध्यक्ष मा. विजयजी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर संघटन वाढ, माणसे जोडणे आणि “गाव तिथे पुरोगामी संघ” हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.
जिल्हाध्यक्ष ते राज्य कार्याध्यक्ष असा अनुभवसंपन्न प्रवास त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला आहे. संघनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सातत्याने माणसे जोडण्याची क्षमता हीच त्यांची ओळख आहे. आज ते राज्याध्यक्ष पदासाठी सक्षम आणि उमदे उमेदवार म्हणून समोर आले आहेत.
संघाबद्दलची त्यांची तळमळ, दिलेला वेळ आणि जपलेली माणसे निश्चितच त्यांच्या पाठीशी उभी राहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अशा खंबीर, निर्भीड आणि समाजाभिमुख नेतृत्वाला राज्याध्यक्ष म्हणून पाहावे, हीच सर्वसामान्यांची भावना आहे.
येत्या 20 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानात पेण या निशाणीवर मतदान करून शंकरसिंह ठाकूर यांना विजयी करावे, असे नम्र आवाहन नांदेड जिल्हाध्यक्ष तथा प्रचार प्रमुख म्हणून करण्यात येत आहे.
राज्याध्यक्ष पदासाठी पुनःश्च शुभेच्छा!












